सुलभ भाषाविज्ञान आणि मराठी व्याकरण हा ग्रंथ महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठातल्या भाषाविज्ञानाच्या अभ्यासकाला आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारा आहे. भाषेच्या, भाषाविज्ञानातील विविध संकल्पना लक्षात घेण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी पडणारा आहे. भाषानिर्मिती प्रक्रिया, स्वनांचे वर्गीकरण, स्वन-स्वनिम्-स्वानांतर, रुपिका-रुपिम-रुपिकांतर, वाक्य विश्लेषण, अर्थप्रक्रिया, शब्दअर्थ संबंध, जागतिक भाषांचे वर्गीकरणाची तत्वे, कुल संकल्पना, आंतर बर्हिवर्तुळ सिद्धांत, भाषिकभेद, मराठी उत्पत्तीचे सिद्धांत, उत्पत्ती विषयक वाद, भाषाविज्ञानातील विविध शाखा, प्रवाह, आंतरविद्याक्षेत्र, स्वरुप या सर्व संकल्पनाची सुटसुटीत व्यवस्थित व सुबोध मांडणी करणारा ग्रंथ आहे. सर्व संकल्पना परिचय करुन घेण्यासाठी उपयुक्त ठरणारा हा ग्रंथ आहे.
त्याचप्रमाणे मराठी व्याकरणातील मूलभूत संकल्पना विशद करणारा, वर्ण, शब्द, शब्दांच्या जाती, विभक्ती प्रत्यय साधक प्रत्यय, विकारी अविकारी, आरकांत प्रत्यय, त्या संदर्भातील विविध वाद त्याचे स्वरुप, वाक्य, वाक्याचे प्रकार, वाक्य संश्लेषण, वाक्य विश्लेषण, समास, प्रयोग व्यवस्था, काळ-अर्थ यांच्या अनुषंगाने होणारे वाक्याचे प्रकार, भाषावैभव प्राप्त करुन देणारे वाक्प्रचार, म्हणी वगैरे घटकांची सविस्तर व सुलभ परिचय करुन देणारा हा ग्रंथ पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देणार्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही.