प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल ह्या भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वी व पृथ्वीशी संबंधित सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. या मध्ये प्रामुख्याने शीलावरण, वातावरण, जिवावरण, व जलावरण या प्रमुख बाबींचा समावेश होतो. पृथ्वीचे भुकवच, पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीच्या बाहेरील असणारे वातावरण, त्या वातावरणाचे विविध घटक, पृथ्वीवरील वायुभार पट्टे, त्यांचा इतर अनेक घटकांवर होणारा परिणाम अभ्यासला जातो. तर मानवी भूगोल या विषयामध्ये मानव व पर्यावरण यामध्ये असणार्या सह संबंधांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोलाचे महत्व, स्वरूप, व्याप्ती, याशिवाय त्यामध्ये मानवी लोकसंख्या, मानवी वसाहत, शेती इत्यादी मानवी जीवनाशी निगडीत बाबींचा अभ्यास केला जातो. मानवाच्या सभोवताली असणारे नैसर्गिक पर्यावरण, त्या पर्यावरणातील अनेक घटक मानवी जीवनावर परिणाम घडवून आणतात. लोकसंखेच्या बाबत भारतीय लोकसंख्या, तिची रचना, वितरण, त्यावर परिणाम करणारे घटक, जागतिक दृष्टिकोणातून लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत, भारतीय लोकसंख्या वाढीचे गुण दोष, तर भारतातील विविध वसाहतींचे प्रकार, आकृतीबंध, नागरीकरण, नागरीकरणाचे स्वरूप, देशात व राज्यातील नागरीकरणाची स्थिति, भारतीय शेती आणि शेतकरी यांची परिस्थिती, शेतीवर परिणाम करणारे घटक, शेती आणि शेतकरी यांच्या समस्या इत्यादी दृष्टीने अनेक बाबींचा ऊहापोह या विषयात विविध उदाहरणांच्या सहाय्याने करण्यात आला आहे.
भूगोल विषयाव्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षा, नेट/सेट परीक्षा, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असाही एक प्रयत्न केला आहे.
Prakritik V Manavi Bhugol