• काव्यगंध

    जीवनवास्तवातून वाट्यास येणाऱ्या अनुभवविश्वाच्या अंतरंगाचे अल्पाक्षरी पण भेदक काव्यात्म दर्शन घडविण्यासाठी कविता आकाराला येत असते. व्यक्तीच्या वैयक्तिक भावविश्वाच्या पडझडीपासून भोवतालच्या जगण्यातील अस्वस्थताजनक घटना-प्रसंगांपर्यंत अभिव्यक्तीचा पैस असलेली कविता विशिष्ट रचनाबंधातून प्रत्ययास येत असते. आत्मनिष्ठ भावकविता ते समाजनिष्ठ जीवनवादी कविता अशा भिन्न भिन्न जाणीवांच्या संपुटातून आकारास येणारी काव्यरचना त्या त्या कविव्यक्तिमत्त्वाच्या जीवनविषयक आकलनाचे, जीवनदृष्टीचे प्रत्यंतर देत असते. अशा अंगाने कविता समजून घेण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या भूमिकेतून सदर पुस्तक सिद्ध झालेले आहे. बहिणाबाई चौधरी ते सुदाम राठोड असा आधुनिक मराठी कवितेचा सुमारे शतकभराचा प्रवास लक्षात आणून देणाऱ्या एकूण सोळा कवितांचे हे संपादन आहे. जीवनविषयक आणि काव्यविषयक विविधांगी जाणिवांची दृष्टी विद्यार्थ्यांच्या मनात पेरणाऱ्या या कविता प्रामुख्याने दीर्घरचनेच्या रूपबंधातून प्रत्ययास येतात. अभ्यासक्रमाच्या उद्देशाने सिद्ध झालेल्या पुस्तकाचा एक चांगला नमुना सदर पुस्तक प्रस्तुत करते.

    – आशुतोष पाटील

    195.00
    Add to cart