21 व्या शतकातही आदिवासी समाज हा अज्ञान, अंधश्रध्दा व दारिद्रयाने बऱ्याच प्रमाणात ग्रासलेला आहे. अज्ञान व गरीबीमुळे शिक्षणापासून वंचित असून मागासलेला आहे. आदिवासी समाज अतीदुर्गम भागात, डोंगरदऱ्यात राहणारा व शहरी जीवनापासून वेगळा राहणारा, स्वत:ची वेगळी अशी संस्कृती टिकविणारा समाज आहे. औद्योगिकीकरण व दळणवळणाच्या साधनांमुळे तसेच शहरी समाजाच्या सानिध्यात आल्यामुळे आदिवासी काही प्रमाणात आपली करु शकला. तसेच सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे याकरीता स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर अनेक समाजसुधारकांनी विविधांगी प्रयत्न केले. आदिवासी समाजाने राष्ट्राच्या आर्थिक विकासातील शिक्षणाचे महत्व ओळखले. सद्य:स्थितीत आदिवासी समाजाच्या प्रगतीकरीता सरकारी व खासगी संस्थांच्या माध्यमातुन विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत. आदिवासींच्या शिक्षणाकरीता विविध प्रयत्न होत असूनही त्यांची शिक्षणाची प्रगती इतर समाजाच्या तुलनेत फारच अल्प असल्याचे निराशाजनक चित्र आजही दिसते.
Aadiwasi Shikshanatil Shaskiyta Yojana