• आंतरराष्ट्रीय संबंध

    आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासाचा नवीन व स्वतंत्र विषय आहे. प्राचीन ग्रीक व रोमन काळातील आंतरराष्ट्रीय संबंधाहून या विषयाचे स्वरूप वेगळे आहे. प्राचीन काळातील संबंध मुख्यत्वे राजकीय स्वरूपाचे होते. परंतु आज राज्याचे परस्परांत राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक असे विभिन्न संबंध प्रस्थापित झालेले आहेत. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय शब्दाचा वापर अठराव्या शतकाच्या शेवटी जेरेमी बेथंमद्वारा केला गेला होता.
    आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपात वेगवेगळ्या कालखंडात परिवर्तन झालेले आहे. आज विज्ञानयुगात दळणवळणाच्या साधनांत झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे राज्याराज्यातील अंतर कमी झाले आहे. तद्वतच आज राष्ट्रांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांना परस्परांवर अवलंबून राहावे लागते. प्राचीन काळातील राज्ये स्वावलंबी होती. परंतु आज ती परस्परावलंबी बनली आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. प्रत्येक राष्ट्र, राज्य हे सार्वभौम आहे. प्रत्येक राज्यसंबंधांवर राष्ट्र आपले धोरण ठरविण्यास स्वतंत्र आहे. अशा स्वतंत्र, सार्वभौम व सत्तासंपन्न राज्यांच्या आपसांतील संबंधास आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतात. सार्वभौम राज्ये आपले हित साध्य करीत असतांना परस्परांशी संघर्ष करतात. या संघर्षात सत्तेचा अधिक उपयोग केला जातो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाला सार्वभौम राज्यांच्या परस्परातील क्रिया व प्रतिक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र मानले जाते.
    वर्तमानकाळात शीतयुद्धाची व्यापकता, टेक्नॉलॉजीचा विकास, वरील वादांचे निर्मूलन, तसेच नवीन राष्ट्रांचा उदय इत्यादी कारणांमुळे आंतरराष्ट्रीय अध्ययनाचे क्षेत्र अधिकच व्यापक झाले आहे.

    Antarrashtriya Sandandh

    575.00
    Add to cart
  • आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत (भाग 2)

    Adhunik Bhartiya Rajkiya Vicharvant (Bhag 2)

    450.00
    Add to cart
  • पंचायत राज

    डॉ. वा. भा. पाटील हे जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातील सेवा निवृत्त प्राध्यापक आणि लोकप्रशासन विभाग प्रमुख असून त्यांची राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयावर दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पदव्युत्तर राज्यशास्त्र विषय शिकविण्याचा त्यांचा गाढा अभ्यास असून महाराष्ट्रीय प्रौढशिक्षणाचे प्रशासन या विषयावर पी.एच.डी. केलेली आहे. त्याचा शासनाला फार मोठा फायदा झालेला आहे. ते एम.ए. राज्यशास्त्र, लोकप्रशासन, बी.एड.पी.एच.डी. असून त्यांचे अनेक संशोधन लेख राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेली असून प्रौढ शिक्षणाचे जळगाव जिल्ह्यातील प्रशासन हा यू.जी.सी. प्रकल्प त्यांनी सादर केलेला आहे.

    Panchayat Raj

    450.00
    Add to cart
  • पंचायत राज

    15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यावर देशात लोकशाही अवतरली. देशाचा राज्यकारभार निर्वाचित लोकप्रतिनिधींमार्फत सुरू झाला. यात केंद्रस्थानी लोकसभा व राज्यसभा निर्माण करण्यात येऊन राज्यस्तरावर विधान सभा व विधान परिषद निर्माण करण्यात येऊन केंद्रस्थानी केंद्रीय मंत्रीमंडळ व राज्यस्थानी राज्य मंत्रीमंडळ कारभार करू लागले. यात सर्व सत्ता केंद्रीय स्थानी व राज्य स्थानी केंद्रीत असल्याने देशातील जनतेचा विकास होण्यात फार मोठी खीळ बसल्याचे राज्यकर्त्यांच्या लक्षात आले. म्हणून हा अडथळा कसा दूर करता येईल. या करिता शासनाने बलवंतराय मेहता, अशोक मेहता, जी. व्ही. के. राव, डॉ. एल. एम. सिंघवी, पी. के. भुंगन, वसंतराव नाईक समिती, ल. ना. बोंगीरवार, मंत्रीमंडळ उपसमिती, पी. बी. पाटील समिती, केंद्र सरकारच्या समित्या, प्रशासकीय सुधार आयोग, सादिक अली समिती, गिरधारीलाल समिती या विविध समित्यांच्या नेमणूका केल्या. सर्वात प्रथम लोकशाही विकेंद्रीकरणाला राज्यस्थान सरकारने प्राधान्य देऊन पंचाय राजचा प्रयोग सुरू केला. 1 मे 1962 पासून पंचायत राजची अधिकृत सुरूवात करण्यात आली.
    प्रस्तुत ग्रंथात स्थानिक स्वराज्य संस्था स्वरूप आणि महत्त्व, पंचायत राज एक ऐतिहासिक संदर्भ, स्वातंत्र्या प्राप्ती पासून आज पर्यंत पंचायत राज, पंचायत राज व भारतीय राज्यघटना 64, 73 वी घटना दुरूस्ती, पंचायत राज प्रमुख विचारधारा, पांच तत्वे, समित्यांचे अहवाल, ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासन, वित्तिय प्रशासन, पदाधिकाऱ्यांची स्थिती व कार्ये, कर्मचारी वर्गाची स्थिती व कार्ये, ग्रामीण विकास व पंचायत राज, विकेंद्रीकरण, स्वयंसेवी संस्था व पंचायत राज. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात पंचायत राजची भूमिका, जनसंख्या नियंत्रणाचे पंचायत राज मॉडेल, महिला आरक्षण तरतूद, जनतेचा सहभाग, नेतृत्व, नियंत्रण, समस्या व पंचायत राजचे मूल्यमापन इ. विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांची सखोल माहिती दिल्याने एमपीएससी, यूपीएससी त्याचप्रमाणे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

    Panchayat Raj

    550.00
    Add to cart
  • भारताचे परराष्ट्रीय धोरण

    जगातील कोणत्याही राष्ट्राला इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करताना त्याविषयीची काही मूलभूत तत्त्वे निश्चित करावी लागतात. त्याचे एखाद्या परराष्ट्राशी कोणत्या प्रकारचे संबंध असावेत. त्या संबंधातून कोणत्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासंबंधीचे अंतिम ध्येय कोणते असावे इत्यादी प्रश्नासंबंधी त्यास साधक-बाधक विचार करावा लागतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला परराष्ट्राशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी निश्चित केलेल्या तत्त्वांना व धोरणांना त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण असे म्हटले जाते. सन 1947 पासून, तर 1964 पासून भारताचे पंतप्रधान नेहरु होते. भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. हे पुस्तक जसे विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त ठरणार आहे. तसेच ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची आवड पण निश्चितच उपयोगी ठरेल.

    Bharatache Parrashtriy Dhoran

    495.00
    Add to cart
  • भारतीय प्रशासन

    प्रशासन म्हणजे शासनाचे कृतीशील स्वरुप होय. या कृतीशीलतेमुळे प्रशासन गतिशील असावे असे सहज स्पष्ट होते, तरी प्रशासकिय संस्थाची सवय स्थिर आणि अविरत राहण्याची असते. मौर्य साम्राज्याच्या काळापर्यत शासन व प्रशासन इतके विकसित होते की, विस्तृत संख्येत शासकिय व प्रशासकिय कार्य सक्षमरित्या करण्याची पात्रता मिळाली होती. मौर्य काळानंतर मात्र शासनाची व प्रशासनाची यंत्रणा साचेबंद स्वरुपाची झाली. मोगल काळात प्रशासन सैनिकी व पोलीस स्वरुपाचे होते. प्रजेला राजकिय अधिकार नव्हते. ब्रिटिश काळात उच्च प्रशासकिय सेवा जन्मजात गुणांवर आधारित होऊन अनुवंशिक आणि प्रादेशिक गतीमानतेचा अभाव असलेली होती. तरीही प्रशिक्षित आणि निष्ठावान अशी होती. स्थानिक स्तरावरील प्रशासन स्वायत्त, विकेंद्रीत आणि स्वशासित स्वरुपाचे होते. 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाले. भारतीय वातावरणाला साजेसे एक व्यावहारीक संविधान करणे हेच घटनाकारांचे उद्दिष्ट होते. आधुनिक काळात राज्याला कल्याणकारी राज्य-प्रशासन कार्याची भूमिका पार पाडावी लागत आहे. प्रशासनाला जनतेच्या कल्याणाचा विचार करुन कार्य करावे लागते.

    सदरील ग्रंथात प्रशासनाशी संबंधित सर्व घटकांचा मुद्देनिहाय समावेश करून त्याचे सविस्तर विवेचन केलेले आहे. ग्रंथाची भाषा साधी, सरळ व सोपी असून सर्व स्पर्धापरीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ ठरावा यासाठीच लेखनप्रपंच!

    Bharatiy Prashasan

    650.00
    Add to cart
  • भारतीय प्रशासन आणि राजकारण

    ‘भारतीय शासन आणि राजकारण’ हा ग्रंथ युजीसी पॅटर्नचा अवलंब करुन तयार करण्यात आला आहे. दिवसेंदिवस भारतीय प्रशासनात व राजकारणात अनेक बदल होत असून होणारे बदल सर्व वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे. सदरील पुस्तक यूपीएससी, एमपीएससी, स्पर्धा परीक्षा तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गासाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी साधी व सरळ आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा समावेश करून त्याबाबत सखोल व सर्वांगिण चर्चा ठिकठिकाणी केली आहे.

    प्रस्तुत पुस्तकात एकूण 40 प्रकरणांचा समावेश असून ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटना समिती निर्मिती, भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने, भारतीय घटनेचा सरनामा, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्ये, मागदर्शक तत्वे, केंद्र राज्य संबंध, केंद्र सरकार, भारताचे राष्ट्रपती, केंद्रसरकार, उपराष्ट्रपती, भारताचा पंतप्रधान, पंतप्रधानाचे कार्यालय, केंद्रीय मंत्रीमंडळ, भारतीय संसद, लोकसभा, राज्यसभा, समितीय पद्धती, केंद्रिय मंत्री, सचिवालय, घटक राज्याचे विधीमंडळ/कार्यकारी मंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, घटक राज्याचे मंत्रीमंडळ, मंत्रीमंडळाचे सचिवालय, घटक राज्यविधी मंडळ विधानसभा, विधान परिषद, भारतातील न्याय व्यवस्था-सर्वोच्च न्यायालय, दुग्ध व्यवसाय, दुय्यम न्यायालये, घटनादुरुस्ती, भारतातील, निर्वाचन आयोग, राष्ट्रीय एकात्मता, राजकिय पक्ष, भारतातील दबाव गट, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षा/ महान्यायवादी/महाधिक्ता, भारतीय राजकारभारातील मुख्य प्रश्न/समस्या-जाती/जातीयवाद, धर्माधर्मवाद, भाषा/ भाषावाद, प्रादेशिकता, दहशतवाद इत्यादी प्रकरणांचा सविस्तर व सखोल परामर्श घेण्यात आलेला आहे.

    Bharatiya Prashasan Aani Rajkaran

    495.00
    Add to cart
  • भारतीय राज्यघटना (भाग 1)

    भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात 100 – 125 वर्षे ब्रिटिशांचे अधिराज्य होते. सन 1857 च्या स्वातंत्र्य-युद्धापासून 1947 पर्यंत भारतीयांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याची एक प्रदीर्घ परंपरा भारताला लाभलेली आहे. भारताची आज जी प्रचलित राज्यघटना आहे तिच्यावर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव पडलेला दिसतो. ब्रिटिश राजवटीत जे विविध स्वरूपाचे कायदे, प्रशासकीय कायदे, योजना व सुधारणा निर्माण करण्यात आल्या त्यांचा प्रभाव भारतीय संविधानावर झालेला दिसतो. 26 नोहेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. या घटनेवरही भारताच्या आधुनिक इतिहासाचा परिणाम अपरिहार्यपणे घडून आला आहे.

    प्रस्तुत ग्रंथ हा युजीसी पॅटर्नचा अवलंब करून तयार करण्यात आला. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा उहापोह करण्यात आलेला आहे.

    Bhartiya Rajghatna (Bhag 1)

    550.00
    Add to cart
  • भारतीय राज्यघटना (भाग 2)

    भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात 100 – 125 वर्षे ब्रिटिशांचे अधिराज्य होते. सन 1857 च्या स्वातंत्र्य-युद्धापासून 1947 पर्यंत भारतीयांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याची एक प्रदीर्घ परंपरा भारताला लाभलेली आहे. भारताची आज जी प्रचलित राज्यघटना आहे तिच्यावर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव पडलेला दिसतो. ब्रिटिश राजवटीत जे विविध स्वरूपाचे कायदे, प्रशासकीय कायदे, योजना व सुधारणा निर्माण करण्यात आल्या त्यांचा प्रभाव भारतीय संविधानावर झालेला दिसतो. 26 नोहेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. या घटनेवरही भारताच्या आधुनिक इतिहासाचा परिणाम अपरिहार्यपणे घडून आला आहे.

    प्रस्तुत ग्रंथ हा युजीसी पॅटर्नचा अवलंब करून तयार करण्यात आला. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा उहापोह करण्यात आलेला आहे.

    Bhartiya Rajghatna (Bhag 2)

    550.00
    Add to cart
  • महाराष्ट्र प्रशासन

    सदर ग्रंथात महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय स्थिती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी, महाराष्ट्र राज्य प्रशासनाची वैशिष्ट्ये, घटकराज्यांचे विधिमंडळ, न्याय व्यवस्था, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, संविधानात्मक व वैधानिक मंडळे, कल्याणकारी प्रशासन, राज्य नियोजन, जिल्हा प्रशासन, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, दबाव गट, पंचायत राज, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळी. त्यात महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, महिला चळवळ, सहकार चळवळ, विद्यार्थी चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ आदी असून त्यांचा परामर्श घेतला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, त्यांचे संघटन, कार्य याचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र निर्मितीपूर्वीच्या सामाजिक, राजकीय स्थितीचा मागोवा घेऊन अद्ययावत स्थितीची सविस्तर माहिती यथायोग्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच सध्याच्या स्थितीतील महाराष्ट्र शासन, त्याचे संघटन व कार्य यांचा तपशील देण्यात आला आहे.

    Maharashtra Prashasan

    695.00
    Add to cart
  • मानवी हक्क

    मानव म्हणून जगण्यासाठी आवश्यक, मानवाच्या नैसर्गिक अस्तित्वाशी संबंधित अशा सर्व अधिकारांना मानवाधिकार म्हणतात. प्रत्येकात आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी, आपले व्यक्तिगत गुण, बुद्धिमत्ता व स्वत्त्व भावनेची जपणूक करण्यासाठी मानवाधिकाराची आवश्यकता असते. मानवी हक्कांमध्ये अंतर्भूत होणारे हक्क म्हणजे जगण्याचा हक्क. अन्न, वस्त्र, निवारा, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, हिंसेपासून मुक्तता, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी हे सर्व हक्क आपल्या जगण्याचा भाग आहेत. स्वतंत्रपणे किंवा समुदायाने जगण्यासंबंधीची चर्चा हे हक्क करतात. तसेच मानवी हक्कांना नैतिक हक्क. तसेच कायदेशीर हक्क असेही म्हणता येईल.

    या ग्रंथात मानवाधिकार, बालविकास, महिला विकास, तरुणवर्गाचा विकास, आदिवासी विकास, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, वृद्धांचे कल्याण, कामगार कल्याण, अपंग कल्याण, लोकांचे पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना, ग्राहक संरक्षण मूल्ये आणि नैतिकता इ. प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.

    Manavi Hakka

    695.00
    Add to cart
  • राजकीय सिद्धांत

    Rajkiya Siddhant

    495.00
    Add to cart
  • लोकप्रशासन

    लोकप्रशासन व्यवस्था प्राचीन काळापासुन कार्यरत आहे. कौटिल्याने अर्थशास्त्र या ग्रंथात प्रशासनाचे किंवा राज्यकारभाराचे नियम व पद्धती यांचे वर्णन केले आहेे. वुड्रो विल्सननी सन 1887 साली राजकारणापासुन प्रशासनाला वेगळे केले तेव्हापासुन लोकप्रशासनाचा उदय झाला आणि त्याला शास्त्राचा दर्जा मिळु लागला. लोकप्रशासन शास्त्राचा अभ्यास विविध अभ्यासकांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनातुन केला. लोकप्रशासनाचे सिद्धांत हे पारंपरिक आणि आधुनिक स्वरुपाचे आहेत. लोकप्रशासनाचा संबंध मानवाच्या विविध पैलूंशी आहे. राज्यांनी स्विकारलेल्या विविध कार्यांमुळे आजचे राज्य हे प्रशासकीय राज्य बनले आहे. गरीब आणि अप्रगत राष्ट्रात लोकप्रशासनाची जबाबदारी आणखी वाढत असते. लोकप्रशासन म्हणजे एक प्रकारे नैतीक कार्य करणारे प्रतिनिधीच आहेत.

    सदरील ग्रंथाची भाषा साधी, सरळ व सोपी असून एमपीएससी, यूपीएससी तसेच सर्व स्पर्धापरीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे.

    Lokprashasan

    550.00
    Add to cart
  • संशोधन पद्धती

    संशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्‍या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.
    सदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.

    Sanshodhan Paddhati

    675.00
    Add to cart
  • स्थानिक स्वराज्य संस्था

    भारतात स्थानिक स्वराज्य संस्था अतिप्राचिन काळापासून अस्तित्वात असलेल्या दिसून येतात; त्यात कालानुक्रमे, दिवसेंदिवस बदल व परिवर्तन होत गेले. त्यामुळे त्यांचा विकास होत गेला. तसेच ब्रिटीश काळातही बरेचसे परिवर्तन झाल्याचे दिसून येते. लॉर्ड रिपन भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर त्यांनी स्थानिक संस्थांबाबतीत जनतेच्या कल्याणाचे अनेक निर्णय घेऊन त्यात आमुलाग्र बदल घडवून आणले.

    या ग्रंथात एकूण 20 प्रकरणांचा आढावा घेण्यात आलेला आहे; त्यात प्रामुख्याने भारतातील स्थानिक स्वराज्य, स्वशासनाची उत्क्रांती, उगम-विकास इतिहास, महाराष्ट्रातील नागरी स्वशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास, स्थानिक स्वशासन, लोकशाही विकेंद्रीकरण, नागरीकरण, स्थानिक स्वशासनाची वैशिष्ट्ये, घटनात्मक, सामूहिक विकास, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगर पंचायत, प्रशासकिय अधिकारी आणि राजकीय अधिकारी यांच्यातील फरक, स्थानिक स्वशासनातील दोष, नगरपालिकांच्या निवडणूका, वित्तिय व्यवस्था, नियंत्रण समस्या, भारतातील शहरीकरण आणि त्यांच्या समस्या, भारतातील प्रमुख महानगरपालिका व मूल्यमापन या प्रकरणांचा मुद्देसूद आढावा घेण्यात आलेला आहे.

    सदरहू ग्रंथ युजीसी पॅटर्नप्रमाणे असून एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परिक्षांना अत्यंत उपयोगी आहे. तेव्हा प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ आहे.

    Sthanik Swarajya Sanstha

    425.00
    Add to cart