• बँकिंगची मूलभूत तत्त्वे

    भारत सरकारच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू केले आहे. या धोरणानुसार ‌‘बँकिंगची मूलभूत तत्त्वे’ या क्रमिक पुस्तकाचे प्रथम प्रकाशन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. बँक व्यवसायासाठीचे प्राथमिक व मूलभूत ज्ञान यावर विशेष प्रकाशन टाकणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा वापर करून प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग बँकेच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास विस्तृतपणे करू शकतील याची आम्हा सर्वांना खात्री आहे.
    सदर पुस्तकामध्ये एकूण 4 प्रकरणे असून प्रथम प्रकरणामध्ये बँकेची पार्श्वभूमी, स्थापना, प्रकार याबद्दल माहिती दिलेली आहे. प्रकरण क्र. 2 व 3 मध्ये बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया, खातेदारांचे प्रकार, कर्जवाटप, ताळेबंद, ग्राहकाची क्रेडिटीबीलीटी इ. ची माहिती आहे. चलनक्षम दस्ताऐवजांच्या प्रकाराचा अभ्यास प्रकरण क्र. 4 मध्ये विस्तृतपणे दिलेला आहे.
    पुस्तक लेखन करत असताना लेखकांनी अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकांचा सखोल अभ्यास करून सर्व संकल्पना साध्या, सोप्या व विद्यार्थ्यांना सहज आकलन होतील अशा भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी तज्ञांचे संदर्भग्रंथ, हस्त प्रकाशने, इतर संबंधीत पुस्तके इ. चा आधार घेण्यात आलेला आहे.

    195.00
    Add to cart