-
गुरूकूल संस्कार
प्राचीनकाळापासून गुरुकुलाची परंपरा भारतीय द्वीपकल्पात सुरू आहे. त्यातून निर्माण झालेली भारतीय संस्कृती वेगळी, सुविद्य, सुविचारी आणि नीतिमुल्यांना जोपासणारी आहे म्हणूनच विश्वात ही भारतीय संस्कृती अग्रस्थानावर आहे. भारतीय संस्कृतीचा लिखीत ठेवा म्हणजे प्राचीन धर्मग्रंथे-वेद, उपनिषदे, पुराणे होत. संस्कृतीच्या महानविचारसूत्रांचेच पुढे प्रतिकात रुपांतर झालेले आहे. आचारसंहिता सामान्यालाही कळावी यासाठी निरनिराळ्या प्रकारचे उत्सव सुरू झाले. भारतीय व्यक्तीमध्ये पुरुषार्थ कायम असून बुद्धीसंपदा जोपासली गेली आहे. जीवनप्रवाह योग्यरितीने व्हावा यासाठी आश्रमव्यवस्था निश्चित केलेली आहे. भारतीय शिक्षणपद्धती सर्वांसाठी खुली असून त्यातील ज्ञान-दानाचेच वृद्धींगत होत आहे. आपल्या गुरुकुलात सर्व प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांवर केले जातात. शिक्षणातील उत्सवांच्या पाठीशी असलेली दृष्टी जर पकडली गेली, त्याची पार्श्वभूमी असलेल्या मंत्रांचे जर मनन झाले तर या सांस्कृतिक इतिहासाच्या निर्मात्या ऋषीसमोर मानव कृतज्ञताबुद्धीने नतमस्तक होते. या ठिकाणचे उत्सव प्रसन्नतेचे प्रेरक, प्रेमाचे पोषक धर्माचे संरक्षक आणि भावनांचे संवर्धक, ऐक्याचे साधक आहेत.
Gurukul Sanskar
-
तेजस्वी प्रज्ञावंत
प्राचीन काळी भारतवर्षात ब्रह्मयज्ञात बालकांना, शिष्यांना शिक्षण देण्याची परंपरा होती. तेथील विविध प्रकारच्या गहन संशोधनातून, लेखनातून, तत्त्वमय आचरणातून, गहन चिंतन-मननातून विविध बालकांचे रूपांतर प्रज्ञावंतांत झाले. आपल्या मुलांना/मुलींना विविध प्रज्ञावंताची ओळख झाली तर ते योग्य मार्ग पत्करू शकतील. आपल्या पाल्याला खेळ, संगीत, नाटक, कथा इत्यादी सर्वांची कला अवगत होणे आवश्यक आहे. लहान बालकांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अतिजागरूकतेने, संवेदनशीलतेने त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान देण्याकडे कटाक्ष ठेवावा. लहान बालके हीच भारतवर्षाची भविष्यकालीन संपत्ती असून, बालकांची क्षमता असतानादेखील त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवणे चुकीचेच ठरते. बुद्धीमत्ता, अंतर्गत आवडी-निवडीच्या नैसर्गिक सृष्टीतील बालके मौल्यवान रत्ने आहेत. बुद्धी नैसर्गिक दैवी शक्ती असली तरी तिचे सामर्थ्य, क्षमता वाढविणे पालकांच्या, गुरुजनांच्याच हातात असते. बुद्धी आणि ज्ञानसंपन्नता प्रगल्भतेचे लक्षण आहे. लहान बालकांना प्रज्ञावंतांची ओळख लहान वयातच व्हावी, त्यांनी विविध गुणांचे जोपासून त्यात वाढ करावी, याच निरामय हेतूसाठी सदरील ग्रंथलेखनाचे प्रयोजन.
Tejaswi Pradnyawant