• चंद्राने चांदणीला विचारले होते (कवितासंग्रह)

    चंद्राने चांदणीला विचारले होते (कवितासंग्रह)

    प्रत्येक कवितेमधील युवती विचार आणि विचारानेच समाजाचे वैचारीक जीवन समृद्ध करण्याचे ध्येय बाळगणारी आहे. तिला उच्च राहणीमान आणि गाडीबंगल्याचा सोस नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा असला म्हणजे पुरे, फालतु चंगळवादी जीवनशैली तिला नको आहे. समाजासाठी जगणार्‍या स्त्रीया का धरतील चंगळवादी जीवनशैलीचा सोस?
    कविता क्रमांक ‘सात’ मधील शिवरंजनी वाचकांच्या मनावर आपला क्रांतिकारी विचारांचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही तसेच तिच्या हळव्या मनाची हळवी भावना वाचकांच्या हृदयावर आपली गुलाबी मोहोर उमटवेलच यात शंका नाही.

    Chandrane Chandnila Vicharale Hote (Kavitasangrah)

    Rs.75.00
    Add to cart
  • प्रहार कथासंग्रह

    प्रहार कथासंग्रह

    या कथासंग्रहात एकूण बारा कथा आहेत. सर्वच कथा या ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणार्‍या आहेत. समाजातील एका विशिष्ठ वर्गाकडून दीन, दलित, पिडीत वर्गावर होणारे अन्याय, अत्याचार, त्यांचे दारिद्य्र, विषमता यावरे प्रकर्षाने उजेड टाकणारे आहे. या कथांमधील पात्रांच्या तोंडचे संवाद ग्रामीण बोलीतील असल्याने कथानकाला एकप्रकारे अस्सल ग्रामीण बाज आलेला आहे. श्री. प्रल्हाद खरे यांच्या कथेतील नायक हा क्रांतीकारी विचारांचा आहे. नव्या विचारांचा वाहक तसेच प्रसारक आहे. त्याला समतेची ज्योत घराघरात नेण्याची तळमळ आहे. समाजामध्ये नव परिवर्तन आणायचे असेल तर काही रुढी परंपरा यांचे भंजन करावे लागेल. यासाठी अशा गोष्टींवर प्रहार केला पाहिजे. तेव्हाच या जोखडातून खर्‍या अर्थाने मुक्त होता येईल. या गोष्टीची जाणीव लेखकाला आहे. वरील सर्वच कथांमधील नायक हे त्या दृष्टीने अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, रुढीपरंपरा यांवर प्रहार करणारे असेच आहेत. यादृष्टीने सदर कथासंग्रहाला दिलेले “प्रहार” हे नाव सार्थ ठरते. वाचक या कथासंग्रहाचे निश्चितच चांगले स्वागत करतील अशी आशा व्यक्त करतो.

    – प्रा. किरण दशमुखे, सटाणा (नाशिक)

    Prahar Kathasangrah

    Rs.125.00
    Add to cart