• आत्मविश्वास

    जीवनानंदाचे सुख-समाधान प्राप्त करणे हे व्यक्ती-व्यक्तीचे कर्तव्य आहे. भीतीग्रस्त आयुष्य, सुख-समाधान, आनंद उपभोगू शकत नाही. जीवनात भीतीचा प्रवेश निरनिराळ्या मार्गांनी, घटनांनी होत असतो. त्यातही संशयाचे भूत फक्त भीतीच निर्माण करीत नाही तर पदोपदी आपल्या शक्तीस, मनोधैर्यास, आत्मबलास नष्ट करीत असते. त्याच संशयाच्या भीतीमधून पापकृत्य, क्रोध-राग किंवा अनैसर्गिक, अवांछित कार्य होत असते. मनाचा संकुचितपणा, मनातील भीती, मनातील साशंकता, मनावरील ताण, मनातील चिंता-काळजी, मनाची निराशा तुमच्या आत्मविश्वासाला धक्का पोहचवितात. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर मनावर नियंत्रण असणे अत्यावश्यक आहे, मनात भीतीचा लवलेशही निर्माण होवू देता कामा नये, मनावर कोणत्याही प्रकारे ताण-तणाव ठेवता कामा नये. जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी सकारात्मक दृष्टीकोनाबरोबर आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. मनोधैर्य किंवा आत्मबल व्यक्तीला सर्वोच्च शिखरापर्यंत पोहचविते. उच्च मनोधैर्याच्या मानसिकतेतूनच भारतमातेची सुरक्षा अबाधित आहे. कुटुंबाच्या, समाजाच्या, गावाच्या, देशाच्या कल्याणासाठी आपणही आपला आत्मविश्वास वाढवावा त्यासाठीच्या प्रक्रियेसाठीच हा लेखनप्रपंच!

    Aatmavishwas

    110.00
    Add to cart
  • आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था (1947 पर्यंत)

    भारतातील ‌‘क्षात्र वृत्ती’ हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. मौर्य, गुप्त, चौल अशा असंख्य राजवटींनी भारताबाहेरही आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहासात पदोपदी उल्लेख आढळतात. राजपूत, शीख, जाट, गोरखा मराठा, डोगरा, गढवाली व दक्षिणेतील नायर-कुर्ग, आग्नेय भारतातील नागा व मिझो जमाती शौर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. भारतीयांच्या एकतेअभावी परकियांना या देशावर राज्य निर्माण करणे शक्य झाले. समुद्रमार्गे आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या सागरी शक्तींकडे भारतीय राजांनी खूप दुर्लक्ष केले. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांनी मोठ्या महत्प्रयासाने, दूरदृष्टिने उभारलेले मराठी आरमार पेशव्यांनी बुडविल्याने इंग्रजांना प्रतिकार करणारी सागरी सत्ताच उरली नाही. 1857 च्या सशस्त्र क्रांतीनंतर भारतातील कंपनी कारभाराला खीळ पोहचली. शिस्तबद्ध, आक्रमक, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा ब्रिटीशांनी स्थानिक लोकांचेच सैन्य उभारून भारतीय सत्तांचा पराभव करीत देशाला गुलामगिरीकडे ढकलले. 20 व्या शतकातील जागतिक महायुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावून आपले कर्तृत्व सिद्ध केले.

    Aadhunik Bharatachi Lashakri Vyavsatha (1947 Paryant)

    185.00
    Add to cart
  • आपत्ती जोखीम निवारण

    विद्यार्थी आणि शिक्षकवर्गासाठी सुनियोजित ज्ञानसंग्रह म्हणून या आपत्ती व्यवस्थापन ग्रंथाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपत्ती जोखीम मूल्यमापन – संकट/आपत्ती संकल्पना, जोखीम, असुरक्षितता आणि आपत्ती, आपत्ती जोखीमेचे मुल्यांकन, भारतातील आपत्ती-पूर, दुष्काळ, भूकंप आणि चक्रवात, मानव निर्मित आपत्ती, आपत्ती जोखीम किमानता मार्ग, आपत्ती शमन व प्रतिबंध आपत्ती शमन व प्रतिबंध, आपत्ती धोका व्यवस्थापन योजना अंमलबजावणी दूर संवेदनाची भूमिका इत्यादी घटकांची सविस्तर मिमांसा केलेली आहे. स्वतःच्या जीविताचे रक्षण करतानाच इतरांच्या जीविताचे रक्षण कसे करता येईल याचसाठी आपत्ती व्यवस्थापन अत्यावश्यक झालेले आहे. प्राणीहानी बरोबरच वित्तहानी थांबवून विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी, तुम्हा, आम्हा सर्वांसाठी हे आपत्ती जोखीम कपात!

    Aapatti Jokhim Kapat

    175.00
    Add to cart
  • आपत्ती व्यवस्थापन

    Apatti Vyavasthapan

    350.00
    Add to cart
  • आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल

    Aapati Vyasthapanach Bhugol

    195.00
    Add to cart
  • औद्योगिक भूगोल

    Audhyogik Bhugol

    350.00
    Add to cart
  • गर्भसंस्कार

    मातृत्व या विश्वातील महान सृजनता आणि संस्कार आहे. ‌‘आई-अपत्याचे’ प्रेम प्रत्यक्ष परमेश्वरालाही गवसलेले नाही. गर्भसंस्काराचा आणि भारतीयांचा अनन्यसंबंध आहे. प्राचीन भारतीयांची जगाला मिळालेली ती एक देणगी आहे. गर्भसंस्काराची आवश्यकता जशी जननी आणि जन्मभूमीसाठी आहे तशीच ती कुटुंब सौख्यासाठी आणि कल्याणासाठी आहे. पती-पत्नी या उभयतांनी भावी जीवनाची फक्त काळजी चिंता करण्यात वेळ दवडू नये तर त्यांनी गर्भावस्थेचा परिपूर्ण आनंद उपभोगावा; निरोगी स्वस्थ बालक जन्माला यावेत, तसेच त्यांच्या पोषणाच्या योग्य ती काळजी घेण्यात यावी यासाठी हे संस्कार अत्यावश्यक आहेत. प्रसुतीपूर्वीची निगराणी जेवढी आवश्यक आहे तेवढी प्रसुतीनंतरही व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. प्राचीन भारतीयांनी शुद्ध बीजासाठी अन बुद्धीमान व आरोग्यसंपन्न प्रसुतीसाठी संस्काराचा मार्ग अवलंबला. संस्कारक्षम उत्तम, कुशाग्र बुद्धीमत्तेची, सशक्त, सर्वगुणसंपन्न पिढी निर्माण करायची असेल तर संस्कार जपलेच पाहिजे. संस्काराची सुरुवात गर्भसंस्कारापासूनच होते. तांत्रिक-वैज्ञानिक, स्पर्धात्मक या बुद्धीमान युगात सक्षम आणि संस्कार संपन्न होण्याचा मूलभूत पाया मुलांच्या जन्माच्या आधीपासून घालणे महत्त्वाचे आहे. त्याचसाठी उत्तम स्वास्थ्य, स्वभाव आणि कुशाग्र बुद्धीमत्तेच्या संततीसाठी गर्भाधान व गर्भसंस्काराची आवश्यकता आहे.

    Garbhasanskar

    195.00
    Add to cart
  • गुरूकूल संस्कार

    प्राचीनकाळापासून गुरुकुलाची परंपरा भारतीय द्वीपकल्पात सुरू आहे. त्यातून निर्माण झालेली भारतीय संस्कृती वेगळी, सुविद्य, सुविचारी आणि नीतिमुल्यांना जोपासणारी आहे म्हणूनच विश्वात ही भारतीय संस्कृती अग्रस्थानावर आहे. भारतीय संस्कृतीचा लिखीत ठेवा म्हणजे प्राचीन धर्मग्रंथे-वेद, उपनिषदे, पुराणे होत. संस्कृतीच्या महानविचारसूत्रांचेच पुढे प्रतिकात रुपांतर झालेले आहे. आचारसंहिता सामान्यालाही कळावी यासाठी निरनिराळ्या प्रकारचे उत्सव सुरू झाले. भारतीय व्यक्तीमध्ये पुरुषार्थ कायम असून बुद्धीसंपदा जोपासली गेली आहे. जीवनप्रवाह योग्यरितीने व्हावा यासाठी आश्रमव्यवस्था निश्चित केलेली आहे. भारतीय शिक्षणपद्धती सर्वांसाठी खुली असून त्यातील ज्ञान-दानाचेच वृद्धींगत होत आहे. आपल्या गुरुकुलात सर्व प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांवर केले जातात. शिक्षणातील उत्सवांच्या पाठीशी असलेली दृष्टी जर पकडली गेली, त्याची पार्श्वभूमी असलेल्या मंत्रांचे जर मनन झाले तर या सांस्कृतिक इतिहासाच्या निर्मात्या ऋषीसमोर मानव कृतज्ञताबुद्धीने नतमस्तक होते. या ठिकाणचे उत्सव प्रसन्नतेचे प्रेरक, प्रेमाचे पोषक धर्माचे संरक्षक आणि भावनांचे संवर्धक, ऐक्याचे साधक आहेत.

    Gurukul Sanskar

    95.00
    Add to cart
  • जलावरण

    जगामध्ये मानवी वस्तीस्थाने जलाभोवतीच आहेत. सागर आणि महासागर नैसर्गिक संपत्तीचे मोठे, अक्षय भांडार आहे. संपूर्ण सागर जलाचे चक्र, पृथ्वीची उत्पत्ती, खंडपरिवहन इत्यादी सर्व बाबी विचारात घेतल्या तर पृथ्वीवरील महासागराचे अस्तित्व न संपणारे आहे. सागर विज्ञानातूनच सागरासंबंधी यथायोग्य माहिती प्राप्त होते. सागर विज्ञानामुळेच पृथ्वीवरील जैवविविधता टिकून आहे. पंधराव्या आणि सोळाव्या शतकामध्ये सागर विज्ञानाच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. 17 व्या शतकामध्ये सागर विज्ञानाची वैज्ञानिक स्तरावर अभ्यासाला सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सागरा संदर्भातील सर्वच बाबीवर लक्ष देवून संशोधन झाले. सागराचे आर्थिक महत्व स्पष्ट झाले. जलभागातील तापमान, प्रदूषण, वादळ-वारे, पाऊस इत्यादी सर्वांचा सजीवांच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे.
    प्रस्तुत पुस्तकात सागरीय भूमी स्वरूपे, सागरजल गुणधर्म, सागरजलाच्या हालचाली, सामुद्रिक निक्षेप आणि प्रवाळ बेटांचा अभ्यासाचा यथायोग्य समावेश केलेला आहे.

    Jalavaran

    110.00
    Add to cart
  • तेजस्वी प्रज्ञावंत

    प्राचीन काळी भारतवर्षात ब्रह्मयज्ञात बालकांना, शिष्यांना शिक्षण देण्याची परंपरा होती. तेथील विविध प्रकारच्या गहन संशोधनातून, लेखनातून, तत्त्वमय आचरणातून, गहन चिंतन-मननातून विविध बालकांचे रूपांतर प्रज्ञावंतांत झाले. आपल्या मुलांना/मुलींना विविध प्रज्ञावंताची ओळख झाली तर ते योग्य मार्ग पत्करू शकतील. आपल्या पाल्याला खेळ, संगीत, नाटक, कथा इत्यादी सर्वांची कला अवगत होणे आवश्यक आहे. लहान बालकांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अतिजागरूकतेने, संवेदनशीलतेने त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान देण्याकडे कटाक्ष ठेवावा. लहान बालके हीच भारतवर्षाची भविष्यकालीन संपत्ती असून, बालकांची क्षमता असतानादेखील त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवणे चुकीचेच ठरते. बुद्धीमत्ता, अंतर्गत आवडी-निवडीच्या नैसर्गिक सृष्टीतील बालके मौल्यवान रत्ने आहेत. बुद्धी नैसर्गिक दैवी शक्ती असली तरी तिचे सामर्थ्य, क्षमता वाढविणे पालकांच्या, गुरुजनांच्याच हातात असते. बुद्धी आणि ज्ञानसंपन्नता प्रगल्भतेचे लक्षण आहे. लहान बालकांना प्रज्ञावंतांची ओळख लहान वयातच व्हावी, त्यांनी विविध गुणांचे जोपासून त्यात वाढ करावी, याच निरामय हेतूसाठी सदरील ग्रंथलेखनाचे प्रयोजन.

    Tejaswi Pradnyawant

    175.00
    Add to cart
  • दहशतवाद आणि नक्षलवाद

    विनाशकाले विपरीत बुद्धी जोपासणार्‍या नराधमांनी संपूर्ण जगात दहशतवादी कारवाया सुरु करुन स्थैर्य नष्ट केलेले आहे. दहशतवादींना जोपासणार्‍या भेकड राष्ट्रांचे भवितव्य अंधारात असून ते इतरांनाही अंधाराच्या गर्तेत ओढत आहेत. दहशतवादी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यसाठी सर्वांची एकजूट आणि सहकार्य अपेक्षित आहे.

    पाकिस्तानने भारतामध्ये दहशतवाद पसरवून अनेक निष्पाप जीवांचे बळी घेतले असून जगभरात थैमान घालणार्‍या दहशतवादाचे मूळ पाकिस्तानातच आहे. पाकिस्तान हे धर्मांध राष्ट्र असून जागतिक दहशतवादाचा अड्डा बनलेला असून वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.

    सदरील पुस्तकात दहशतवादाचे प्रकार, अणुदहशतवाद, भारत-पाक दहशतवादी संघटना, दहशतवादी हल्ले, 7/9 व 26/11 चे हल्ले, भारत-अफगाण व दहशतवाद, प्रमुख दहशतवादी संघटना, भारतावरील हल्ले, पाकिस्तान दहशतवाद, नक्षलवाद, इतिहास, नक्षलवादी भारतीय समस्या, गंभीर स्वरुप, दहशतवाद-नक्षलवाद आणि सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध (नियंत्रण) वगैरे माहितीचा समावेश केला आहे.

    राष्ट्राचे भवितव्य घडविणार्‍या तरुण आधारस्तंभांनी दहशतवादाबद्दल सखोलता, वास्तविकता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून भारताच्या तसेच जगाच्या विकासासाठी ते साहाय्यभूत ठरेल.

    Dahshatwad Ani Nakshalwad

    275.00
    Add to cart
  • निरामय चैतन्य

    निरामय आनंदी जीवनाचे रहस्य जाणून घेऊन समाधानी, सुखी जीवन जगण्यातच बुद्धीकौशल्य आहे. आयुष्याच्या सर्वच वाटा सरळ नाहीत. त्या मार्गावर अनेक वळणेही आहेत. वळणावर योग्यरित्या वळणे, प्रसंगावधान राखण्यातच शहाणपणा आहे. मानवी शरीरशास्त्रातील सर्वच ज्ञान मानवाला गवसले आहे, हे म्हणणे अतिशयोक्तीच होईल. परमेश्वराने सुप्त सामर्थ्याने पुनरुत्पादनाची प्रक्रिया सुरु ठेवलेली आहे. मानवी जीवनात जन्मास आलेले बाळ, त्याचे शारिरीक अवयव आणि सुरक्षा परंपरेने विकसीत होत आलेले आहेत. पूर्वी बाळाच्या जन्माच्यावेळी कापलेली नाळ निरुपयोगी समजून फेकून दिली जात असे. पण त्या नाळेत बाळाचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे सुरक्षाकवच दडलेले आहे, याची जाण अलीकडेच झालेली आहे. बाळाच्या नाळेत सुमारे 300 विकाररोग दूर करण्याची क्षमता आहे; म्हणूनच तिची साठवण महत्वाची आहे. शरीरातील सर्व नियंत्रक नाड्या नाभीरत केंद्रीत आहेत आणि त्या नाभीचे महत्व जाणून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच निरामय आनंदी जीवनाचे फलीत आहे.

    Niramay Chaitanya

    150.00
    Add to cart
  • निरोगी स्वास्थ्य

    निर्मळ आनंदी-समाधानी जीवनासाठी स्वत:चे आरोग्य शारीरिक, मानसिक दृष्ट्या उत्तम, सक्षम असणे अत्यावश्यक आहे. शारीरिक संतुलनासाठी, प्रत्येक आनंदी क्षणासाठी अन्नाचे व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. आहार, विहार-निद्रा यांचा योग्य समन्वय साधला गेला तर विकाराचा आकारच नष्ट होतो. ‌‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह’ आहे. शरीराचे पोट आणि मेंदू ही दोन्ही ‌‘ऊर्जा निर्मिती केंद्रे’ आहेत. त्यांचे सुस्थितीतील कार्य व गती आपल्या सात्त्विक आहाराशीच संबंधित आहे. शरीराला ‌‘चैतन्य ऊर्जा’ अन्नातूनच प्राप्त होते. त्याच ऊर्जेतून वासना निर्मिती आणि मेंदू कार्य सुरू होते. शरीर ही एक नैसर्गिक रसायनशाळाच आहे. मानसिक ताण-तणावामुळे रसायनीच संतुलन बिघडते. आहाराचाच सौंदर्याशी घनिष्ठ संबंध आहे. ‌‘तूप खाल्ल्यानेच रूप येतं’ हा अनुभव जोपासा. चेहराच आपल्या मनाचा आरसा असल्याने बाह्य सौंदर्याबरोबर मनाचे सौंदर्य कायम करणे गरजेचे आहे.
    रोग, त्याची लक्षणे आणि त्यावरील औषधे ही माहिती देताना चौधरी दांपत्याचे व डॉ. हर्षल यांनी खूप मेहनत घेतलेली दिसते. त्यांचा या विकारासंबंधीचा अभ्यास सखोल असून तो समाजोपयोगी ठरणार आहे. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोहोंचा सुंदर समन्वय ‌‘निरोगी स्वास्थ्यात’ झालेला आहे.

    375.00
    Add to cart
  • निसर्गोपचार : निरामय, निरोगी जीवनाचा लाभ करून देणारी जीवनपध्दती

    निसर्गोपचार ही एक उपचार पध्दती आहे. आपल्याला नेहमी माहिती असलेल्या औषधोपचार पध्दती म्हणजे आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी/इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी ह्या होत. याशिवाय अ‍ॅक्युप्रेशर चिकित्सा व अ‍ॅक्युपंक्चर, चुंबक चिकित्सा, योगोपचार आणि निसर्गोपचार या नवीन उपचार पध्दती आहेत. सध्या अलिकडच्या प्रदुषित वातावरणात, रोगट परिस्थितीत निसर्गोपचार चिकित्सा सर्वांना माहिती होणे ही काळाची गरज आहे.
    मानवी शरीर आणि मानवी मन यावर ताबा मिळविता येतो, नियंत्रण ठेवता येते. नैसर्गिक आणि सात्विक आहारामुळे शरीरामध्ये बदल घडवून आणता येतात; तर प्राणायाम, ध्यानसाधना, योगासने, दिर्घश्वसन याद्वारे मन बदलविता येते. म्हणजेच निसर्गोपचारामध्ये शरीरावर व मनावर नियंत्रण घालून रोग विकारापासून स्वत:चे संरक्षण करता येते. सध्याच्या युगात निसर्गोपचार पध्दतीमध्ये आहार चिकित्सा, उपवास चिकित्सा, अ‍ॅक्युप्रेशर/अ‍ॅक्युपंक्चर, योगोपचार, वनौषधी, पुष्पौषधी इत्यादी चिकित्सांचा समावेश केला जातो. याचाच अर्थ असा की, पर्यावरणात, निसर्गसृष्टीत जे काही चांगले आहे त्या सर्वांचा समन्वय यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळेच निसर्गोपचार पध्दती ही अत्यंत गुणकारी, चमत्कारी, क्रांतीकारी उपचार पध्दती तयार झालेली आहे. ही पध्दती मानवी जीवनाच्या कल्याणासाठी एक दैवी शक्ती आहे.

    Nisargapachar : Niramay, Nirogi Jeevanacha Labha Karun Denari Jeevanpaddhati

    225.00
    Add to cart
  • पर्यटन भू-विज्ञान

    Paryatan Bhuvidnyan

    150.00
    Add to cart
  • प्रात्यक्षिक भूगोल

    भूगोलाच्या अध्ययनात आणि अध्यापनात प्रात्यक्षिक भूगोलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रात्यक्षिक भूगोलामध्ये आजूबाजूच्या परिसराचे अवलोकन, निरिक्षण, परिक्षण, सर्वेक्षण महत्त्वाचे असून त्यासाठी अनेक उपयोगी साधनांचा वापर केला जातो. प्रात्यक्षिक भूगोलात आपणास संपूर्ण परिस्थितीचा यथायोग्य अभ्यास करणे शक्य होते. प्रात्यक्षिक भूगोलाद्वारे भूभागाचे निरीक्षण त्याचे स्वरूप, प्रकार, त्याचा मानवी जीवनावरील परिणाम निश्चित केला जातो. भूगोलाचा आत्मा आणि पायाभूत आधार असलेल्या नकाशाची मांडणी, आरेखन, त्याचे प्रत्यक्ष वाचन प्रात्यक्षिक भूगोलातून शक्य असते.
    सदरील पुस्तकात नकाशाशास्त्र, नकाशाप्रमाण, दिशा-उपदिशा, उठाव दर्शविण्याच्या पध्दती, नकाशा प्रक्षपणे, सांकेतिक प्रक्षपणे, नकाशा आकार – विस्तार आणि लघुकरण, भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे व त्यांचे वाचन, भारतीय दैनंदिन. हवामानदर्शक नकाशे, सर्वेक्षण, मोजणी, साखळी व टेप सर्वेक्षण, समतल फलक सर्वेक्षण, प्रिझमी कंपास सर्वेक्षण, डम्पी समतलन मोजणी, नतिमापी मोजणीची अन्य उपकरणे, खडकांचा अभ्यास, जागतिक स्थिती पध्दती, सांख्यिकी आकडेवारी, क्षेत्रीय अभ्यास, पर्यटन अहवाल इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा सविस्तर व मुद्देसूदपणे समावेश केला आहे.

    Pratyakshik Bhugol

    395.00
    Add to cart
  • भारताचा प्रादेशिक भूगोल

    Bhartacha Pradeshik Bhugol

    350.00
    Add to cart
  • भारताचा भूगोल

    Bharatacha Bhugol

    575.00
    Add to cart
  • भारताचा शोध

    भारतवर्ष भारतीय संस्कृतीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. भारतवर्षाची संकल्पना, वेद उपनिषदे, हिंदू, जैन, बौद्ध साहित्य, भारताची ज्ञानपरंपरा कला आणि संस्कृतीत हडप्पा, सिंधु संस्कृतीमधील स्थापत्यकला, शिल्पकला, मुर्तीकला, चित्रकला तसेच निरनिराळ्या कालावधीमधील कलासंस्कृती विकासाचा समावेश केला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत प्राचीन विद्यापीठे, तक्षशिला विद्यापीठ, मदुरा विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ आणि नालंदा विद्यापीठाचा परिचय देऊन भारतीय शिक्षणपद्धती स्पष्ट करण्यात आलेली आहे. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान आणि ग्रामीण संस्कृती विकासातील सर्वधर्मीय विचार, विस्तार, जनपद, ग्रामस्वराज्याबद्दल माहितीचे संकलन केलेले आहे. प्राचीन भारतातील विज्ञान, पर्यावरण आणि औषधीशास्त्राची माहिती देताना पर्यावरण जाणीव जागृती, आयुर्वेद, योग विपश्यना आणि निसर्गोपचारांची ओळख करून दिलेली आहे. भारतीय आर्थिक परंपरा आणि ज्योतिषशास्त्र विकासात भारतीय व्यवसाय, उद्योग समुद्री व्यापार तसेच अर्थतज्ज्ञांच्या आर्थिक विचारांचा समावेश केलेला आहे.

    Bhartach Shoda

    135.00
    Add to cart
  • भारताची राष्ट्रीय सुरक्षा

    Bharatachi Rashtriya Surksha

    250.00
    Add to cart
  • भारतीय लष्करी इतिहास

    आधुनिक संरक्षणशास्त्राचा विकास होण्यासाठी लष्करी इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. युद्धकलेच्या अभ्यासाने, संशोधनाने ज्ञान समृद्ध होते. तसेच आत्मविश्वास वाढतो; त्याच कारणाने भारतीय युद्धकला अभ्यासक्रम अभ्यासासाठी निश्चित केलेला आहे. भारतीय युद्धकला अत्यंत समृद्ध असून ती अती प्राचीन आहे. प्राचीन भारतीय इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेच्या खुणा जपणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या बरोबर संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवनिर्मित सर्वच तंत्राची, विज्ञानाची व कलांची प्रगती झालेली दिसते. वेद, पुराणशास्त्रे आणि उपनिषदे इत्यादी साहित्यातून आणि लोकपरंपरातून आजच्या विकसीत मानवी जीवनाच्या खाणाखुणा अभ्यासताना वैश्विक विकासाची दिशा स्पष्ट होते. प्राचीन लढायातून युद्धकला स्पष्ट होते. प्राचीन भारतातील युद्धनीती, डावपेच, युद्धयोजना सैनिक, शस्त्रास्त्रे इत्यादी संदर्भातील माहिती सर्वच प्रकारच्या लष्करासाठी उपयुक्त आहे. संबंधित अभ्यासक्रमातील निरनिराळे घटक विचारात घेवून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल अशीच आशा आहे.

    Bharatiy Lashkari Itihas

    295.00
    Add to cart
  • भारतीय लैंगिक शिक्षण

    21व्या शतकात लैंगिक शिक्षण मानवी जीवनासाठी अत्यावश्यक स्वरुपाचे शिक्षण आहे. समाजात असलेल्या अनेक गंभीर प्रश्नांपैकी एक असा हा प्रश्न असून समाजातील सामाजिक नियंत्रणे संयमपूर्वक, स्वास्थपूर्वक सर्वांकडून पाळली जावी यासाठीही लैंगिक शिक्षणाची देणे ही काळाची गरज आहे. सद्य:स्थितीत गतिमान आणि बदलती जीवनपद्धती यामुळे आईवडील आणि मुलांमधील संवाद कमी झाला आहे. शारीरिक बदलांची इत्थंभूत माहिती मुलामुलींना मिळाली नाही, तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. सामाजिक जीवनापासून दूर जाऊन त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढतो. वाढत्या वयानुसार मुलामुलींमध्ये होणार्‍या शारीरीक बदलांची माहिती त्यांना आवश्यक तेव्हा आणि वेळेत मिळाल्यास त्यांच्यात गैरसमज निर्माण होणार नाहीत. त्यांच्यात आरोग्याची काळजी घेण्याची सवय निर्माण होऊन शारीरिक स्वास्थ्याबरोबर त्यांचे मानसिक व भावनिक स्वास्थ टिकून राहील. परिणामी सुदृढ समाजाची निर्मिती होईल.
    मुलामुलींना लैंगिक शिक्षणाची जबाबदारी ही सर्वांची असून त्यात आई-वडील किंवा पालक, शिक्षक तसेच समाजसेवी संस्था व सरकार यांचा देखील समावेश होतो. वैज्ञानिक आणि तांत्रिक युगामध्ये परंपरावादी, जुन्या बुरसटलेल्या विचारांना थारा देणे योग्य नाही. अल्पायुषी असलेल्या मानवी जीवनात आरोग्य स्वास्थासाठी योग्य वेळेस योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे.

    Bharatiya Langik Shikshan

    195.00
    Add to cart
  • भौगोलिक सर्वेक्षण व मोजणी

    मोजणीशास्त्राची जीवनामध्ये पदोपदी आवश्यकता असते. भारतात सुरुवातीला बांबू, काठीने मोजणीला सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम असो किंवा भू-संरक्षण असो त्यासाठी मोजणी अत्यावश्यक आहे. प्रामुख्याने या शास्त्राचा उपयोग देश-गाव यांच्या मोजणीसाठी किंवा नकाशासाठी फक्त उपयोग होत नाही तर त्यापेक्षा जास्त त्याचा उपयोग आपल्या स्थापत्य शास्त्रामध्ये केला जातो आहे. देशामध्ये नागरी स्थापत्य शास्त्राचे कार्य या मोजणी मापनशास्त्रानेच सुरु आहे. घराची, इमारतीची बांधणी असो किंवा रेल्वे, रुळ, कालवा, बोगदे असो त्यासर्वांसाठी हे शास्त्र अत्यंत उपयुक्त झालेले आहे. गाव-गाव, गाव-शहर, शहर-शहर इत्यादी सर्व जोडणीचे रस्ते, घाट रस्ते, पूल, किंवा धरणे बांधणीच्या कार्यात मोजणीशास्त्र अत्यावश्यक झालेले आहे.
    सर्वसामान्यांना आणि विद्यार्थी वर्गाला मापनशास्त्राची प्रारंभिक ओळख आणि माहितीची गरज असते. हे लक्षात घेऊनच मापनशास्त्रावर आपल्या मातृभाषेतून हे पुस्तक लिखाण झाले आहे. पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय सुजाण नागरिकासाठी या लेखनाचा निश्चितच उपयोग होईल या हेतूने पुस्तकाचे लिखाण केलेले आहे.

    295.00
    Add to cart
  • महाराष्ट्राचा भूगोल

    21 व्या शतकातील माहितीच्या युगात विविध तंत्रज्ञान विकसीत होत असतानाच भूगोल शाखेत देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहेत. परिणामी भूगोल विषयात अधिकाधिक अचूकता येवून ‘मानवी कल्याणा’ची साध्यता होत आहे. भारतीय इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाला विशेष महत्व आहे. भारतातील प्रत्येक राज्याची आपापली भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय, पर्यटनविषयक, लोकसंख्याविषयक विशेषता असून महाराष्ट्राच्या भूगोलाचाही त्यात समावेश होतो. परिणामी महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, महाराष्ट्राचा पर्यावरणीय भूगोल, लोकसंख्या, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे व त्यांची भौगोलिक, ऐतिहासिक व इतर वैशिष्ट्ये यांचा समावेश सदरील पुस्तकात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेला आहे. सुबक आकृत्या व अचूक नकाशे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भूगोलाचा परामर्श घेतलेला आहे.

    Maharashtracha Bhugol

    275.00
    Add to cart
  • मोजणीशास्त्र (मोजणी/मापन शास्त्र)

    मोजणीशास्त्राची जीवनामध्ये पदोपदी आवश्यकता असते. भारतात सुरुवातीला बांबू, काठीने मोजणीला सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम असो किंवा भू-संरक्षण असो त्यासाठी मोजणी अत्यावश्यक आहे. प्रामुख्याने या शास्त्राचा उपयोग देश-गाव यांच्या मोजणीसाठी किंवा नकाशासाठी फक्त उपयोग होत नाही तर त्यापेक्षा जास्त त्याचा उपयोग आपल्या स्थापत्य शास्त्रामध्ये केला जातो आहे. देशामध्ये नागरी स्थापत्य शास्त्राचे कार्य या मोजणी मापनशास्त्रानेच सुरु आहे. घराची, इमारतीची बांधणी असो किंवा रेल्वे, रुळ, कालवा, बोगदे असो त्यासर्वांसाठी हे शास्त्र अत्यंत उपयुक्त झालेले आहे. गाव-गाव, गाव-शहर, शहर-शहर इत्यादी सर्व जोडणीचे रस्ते, घाट रस्ते, पूल, किंवा धरणे बांधणीच्या कार्यात मोजणीशास्त्र अत्यावश्यक झालेले आहे.
    सर्वसामान्यांना आणि विद्यार्थी वर्गाला मापनशास्त्राची प्रारंभिक ओळख आणि माहितीची गरज असते. हे लक्षात घेऊनच मापनशास्त्रावर आपल्या मातृभाषेतून हे पुस्तक लिखाण झाले आहे. पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय सुजाण नागरिकासाठी या लेखनाचा निश्चितच उपयोग होईल या हेतूने पुस्तकाचे लिखाण केलेले आहे.

    Mojanishastra (Mojani/Mapan Shastra)

    295.00
    Add to cart
  • युद्ध आणि शांती (1945 पासून इतिहास)

    युद्धप्रवृत्ती सर्व प्राणीमात्रात निसर्गतःच जोपासली गेली आहे. आदिमानवापासून आतापर्यंत उत्क्रांतीमुळे बदलत्या मानवी जीवनातील युद्धाचे स्थान कधीही ढळले नाही; महत्व कमी झालेले नाही. मानवी सभ्यता आणि संस्कृतीचा विकास युद्धाशी संबंधित आहे. समाजाचे अस्तित्व आणि विकास युद्धामुळेच नियंत्रित होत आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर उदयास आलेल्या अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन्ही महाशक्तींनी आपआपले अस्तित्व जोपासण्याचा प्रयत्न केला. दोन्ही महाशक्तींमध्ये संघर्ष तेवत राहिला तरी त्याचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धात न होता शीतयुद्धात झाले. जागतिक राजकारणात अनेक स्थित्यंतरे दुसर्‍या महायुद्धानंतर झालीत.
    महायुद्धानंतर सर्व देशात जागतिक स्तरावर, आर्थिक, सामाजिक, राजकीय व लष्करीशक्तीची नवीन मांडणी पुढे आली. त्या परिस्थितीत स्थानिक संघर्षानेही जोम धरला. शीतयुद्ध समाप्तीच्या उंबरठ्यावर असताना राजकीय घडामोडींना गतीमानता आली. महासत्तेचे केंद्र असलेल्या आशियाई खंडातील चीन, रशिया, भारत, जपान याच बरोबर इराणचे सत्ता वर्चस्व वाढीस लागले.
    प्रस्तुत पुस्तकात युद्ध संकल्पना, युद्धाची कारणे, युद्ध प्रकार, अणुयुद्ध, रासायनिक व जैविक युद्ध, जागतिक पुनर्रचनेची निर्मिती, शीत युद्ध, युद्ध आणि अर्थव्यवस्था, आधुनिक युद्ध सामरिकी, विविध करार, संघटना, सत्ता संतुलन, अलिप्ततावादी चळवळ वगैरे मुद्द्यांचा सर्वंकष विचारविमर्श केलेला आहे.

    Yudha and Shanti

    250.00
    Add to cart
  • रशिया आणि युक्रेन युद्ध

    युक्रेनवर दीर्घकाळापासून सुरु असलेल्या रशियन हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. जागतिक शांततेला गालबोट लागले आहे. अशांत स्थितीत सर्वच राष्ट्र सावध झालेत. युद्धाक्रमणातील भयानकता तिसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करते काय अशी शक्यता निर्माण झाली. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या अणुबाँम्ब आणि अण्वस्त्रांच्या स्फोटाच्या धमक्यातून जागतिक मानव सृष्टीला आणि व्यापाराला वेगळेच वळण मिळालेत. महाशक्तीशाली होण्याच्या महत्वाकांक्षेतून सत्तांधता वाढली, नितीमत्ता संपली, सामाजिक ऐक्य दुभंगले. अन्‌‍ माणूसकीला काळीमा फासला गेला. आतापर्यंत सर्वच स्तरावर युद्धाचे ढग संचारले आहे. महागाई अनियंत्रित होवून नैसर्गिक तेल, वायूवर दबाव वाढला आहे. चिंताक्रांत राजकारणी कोणत्या टोकाला पोहचतील याची शक्यता वर्तविता येत नाही.
    सर्वसामान्यांना, वाचकांना परिस्थितीची जाणिव व्हावी आणि युद्ध हालचालीचे ज्ञान व्हावे म्हणूनच हा लेखनप्रपंच.

    Rashiya aani Yukren Yuddha

    225.00
    Add to cart
  • लष्करी भूगोल (सैनिकी भूगोल)

    Lashakari Bhugol (Sainiki Bhugol)

    275.00
    Add to cart
  • लष्करी विचारवंत

    प्राकृतिक घटकांच्या अनुषंगाने ठरविलेले संरक्षणविषयक धोरणक्षेत्र विचार म्हणजेच सैनिकी विचार होत. सैनिकी शक्ती, सुरक्षेच्या हमी किंवा संरक्षणाच्या योग्य व्यवस्थेशिवाय राष्ट्रीय अस्तित्व टिकू शकत नाही. त्याचा मूलभूत स्त्रोत म्हणजे आपले विचारवंत होत. विचारवंत हे अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, समाजसेवक, भूगोलतज्ञ, उद्योगपती किंवा लढवैय्ये योद्धा असतील, त्या सर्वांच्या सारासार विचारसरणीतून देशाचे भवितव्य साकारते. देशाची प्रगती, स्थैर्य, शांतता व स्वातंत्र्य अबाधित राहते. प्रस्तुत लिखाणात पाश्चात्य विचारवंताबरोबर पौर्वात्य विचारवंतही विचारात घेतले आहेत. शिवाय सर्व प्रमुख महान भारतीयांची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रामुख्याने कौटिल्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, मोहनदास गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वि.दा. सावरकर, पं. नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग, इंदिरा गांधी, श्री अटलबिहारी वाजपेयी, फील्ड मार्शल सॅम, माणेकशा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यासारख्या देशहितवादी विचारवंतांच्या विचाराचा समावेश असून जनरल सन्त्जू, मॅकियाव्हेली निक्कोलो, गुस्तावस एडाल्फ पासून तर कॅप्टन सादत आणि इसाकू साटो पर्यंतच्या पाश्चात्य विचारवंतांचाही समावेश केला आहे.

    Lashkari Vicharwant

    395.00
    Add to cart
  • वातावरण

    पृथ्वीच्या पृष्ठभागावर, वातावरणात आणि पृथ्वीच्या अंतरंगात जे काही सामावलेले आहे त्या सगळ्यांचा समावेश पर्यावरणात होतो. यामध्ये जमीन, हवा, पाणी निरनिराळ्या वायूराशी, सर्व वनस्पती, सर्व सजीव, खनिजे, नैसर्गिक वायू, खनिजतेल इत्यादींचा समावेश होता. पर्यावरणातील सजीव घटकांपैकी मानव हा एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरणामध्ये प्राणवायुशिवाय अन्यही घटक आहेत. हवेमध्ये सुमारे 80 टक्के नत्रवायु असून बाकी उरलेल्या 20 टक्केमध्ये प्राणवायु सुद्धा आहे.परंतु पर्यावरणाच्या केंद्रस्थानी स्वत:ची स्थिती कायम ठेवून मानवाने नैसर्गिक संतुलन बिघडविण्यास सुरूवात केलेली स्पष्ट दिसून येते. पर्यावरणाचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत्या स्वरूपाचे आहे.
    प्रस्तुत पुस्तकात वातावरण परिचय, हवा-हवामान, वातावरणाचे घटक, संघटन, सूर्यप्रकाश आणि तापमान, सौरऊर्जा, तापमान वितरण, वायुभार आणि वारे, ऋतुमानानुसार परिवर्तन, भारपट्टे, वर्गीकरण, आर्द्रता आणि हवामानशास्त्रांचा उपयोगाचा समावेश झालेला दिसून येतो.

    Vatavaran

    150.00
    Add to cart
  • वास्तु विज्ञान

    पंचमहाभूतावर आधारित असलेल्या वास्तुशास्त्रात ब्रम्हकन्या ‘सरस्वती’ आणि सुपूत्र ‘विश्वकर्माचा’ सहभाग आहे. वास्तुशास्त्र सर्व समावेशक शास्त्र असून त्याच्या निर्मितीसाठी भौतिक नियमाबरोबरच आपल्या सभोवतालचा सूक्ष्म अध्यात्मिक शक्तीची जाण असणे आवश्यक असते.
    भारतीय धर्मग्रंथामध्ये, वेद-उपनिषादमध्ये आणि पौराणिक सूक्तामध्ये वास्तूबद्दल उल्लेख आहे. कौटुंबिक जीवन जगताना नैसर्गिक सुख तसेच अधिकाधिक विश्रांतीच्या छायेसाठी संतुलीत घराची आवश्यकता असते.
    बांधकाम साहित्याच्या भौतिक गुणाबरोबरच त्यांच्याशी संबंधित सर्व ऊर्जास्रोतांचाही विचार वास्तुशास्त्रात केला जातो. जीवनात सर्वोत्कृष्ट मार्गाचा अवलंब केला तर आपल्याला इच्छित स्थळी लवकरात लवकर सहज व सुरक्षित रित्या पोहचता येते. वास्तुशास्त्रात प्रतिकात्मकरित्या सूत्रांच्या रूपात विना अडथळ्यांचा मार्ग सूचविलेला असतो. सदरील ग्रंथात वास्तुशास्त्र, वास्तुकला इतिहास, वास्तुआकार, वास्तुनियोजन/नकाशा, वास्तु घटक, वास्तुनिर्मिती, प्रवेशद्वार, गृहप्रवेश, वास्तुदोष निवारण, वास्तु या सर्व घटकांचा परामर्श घेण्यात आलेला आहे.

    Vastu Science

    150.00
    Add to cart
  • व्यक्तिमत्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स

    व्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य तत्ववेत्ते आणि संशोधकांनी प्राचीन काळापासून केला आहे. व्यक्तीला व्यक्तित्व असते तसेच व्यक्तिमत्त्वदेखील असते. निसर्गातील सर्वच प्राणीमात्रांना व्यक्तीत्व असते. निसर्गाकडून प्राप्त झालेली ही देणगी स्वकर्तृत्वाने दैदिप्यमान होवू शकते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्यांची आवश्यकता असते. आजच्या गतिमान, स्पर्धात्मक अशा एकविसाव्या शतकात व्यवस्थापन कसे करावे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी लोक उपलब्ध वेळेचे व्यवस्थापन कौशल्य वापरून करतात. मानवी जीवनात बालपण, तरुणपण आणि उतारपण या अवस्थांमध्ये त्या त्या परिस्थितीनुसार ध्येय बदलत असतात. तात्पुरत्या यशाने हुरळून जावू नये आणि अपयश आले म्हणून मागेही हटू नये. आपण स्वतःविषयी काय विचार करतो यावर आपल्या आयुष्याची गुणवत्ता काय असेल हे बहुतांशी निर्धारित होत असते. सर्वात म्हणजे पैसे देऊन आपण स्वतःचा वेळ विकत घेऊ शकत नाही आणि एकदा निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही.

    Vyaktimatva Vikas Ani Soft Skills

    175.00
    Add to cart