• आधुनिक भारताचा इतिहास (सन 1757 ते 1857)

    आधुनिक भारताचा हा कालखंड अनेक स्थित्यंतरे व प्रचंड उलथापालथीचा होता. या कालखंडात राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, वैचारिक बदल घडून आलेत या बदलाचे भारताच्या राजकीय पटलावर जे परिणाम झालेत ते दूरगामी स्वरुपाचे दिसून येतात.

    अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते 1857 पर्यंत भारतात इंग्रजी सत्तेची पायाभरणी झाली. ही परकीय राजसत्ता कशी प्रस्थापित झाली व कशी दृढमूल झाली याची माहिती घेण्याच्या दृष्टीने आवश्यक ते इंग्रजी शासनाचा तपशील दिला आहे. या कालावधीत एकीकडे इंग्रज साम्राज्यवादी सत्तेची मुठ हिंदुस्थान भोवती आवळत गेले, तर दुसरीकडे भारतात आधुनिक मूल्ये रुजू लागली.

    सन 1757 ते 1857 हा काळ आधुनिक भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. भारतीयांचा परकीयांशी आलेला संबंध त्यांनी केलेले आर्थिक शोषण, त्याच बरोबर भारतात प्रबोधनाच्या दृष्टीने आधुनिक पर्वास झालेला प्रारंभ याचा या ग्रंथात साकल्याने विचार केला आहे.

    Adhunik Bharatacha Itihas (1757 te 1857)

    250.00
    Read more
  • इतिहासातील संशोधन पद्धती

    इतिहासकार कसा असावा याबाबत महान इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
    इतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा आणि पंक्तिप्रपंच न करणारा असा असला पाहिजे. भावनाविरहित, आपुलकिची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे. इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा असला पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे पण उघडे असणारे त्यांचे मन पाहिजे. खोटे-नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्यांची छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे म्हणजे सत्यानिष्ठा हा इतिहासाचा आत्मा असतो. डॉ. आंबेडकरांनी भारतीय इतिहासावर जे लिखाण केले ते वस्तुनिष्ठता व सत्यनिष्ठेने केले.

    डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
    (शुद्र मूळचे कोण होते)

    Itihaas Sanshodhan Paddhati

    150.00
    Add to cart
  • भारताचा इतिहास (इ. स. 1857 – इ. स. 1950)

    सन 1857 ते 1950 या कालखंडातील भारताचा इतिहास हा राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीबरोबरच सामाजिक, धार्मिक सुधारणा चळवळी आणि अनेक घटकांच्या अस्तित्वाच्या जागृतीचा, प्रतिउत्तराने व्यापलेला इतिहास आहे. भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचा प्रारंभ होऊन विविध धार्मिक सामाजिक चळवळीत विविध संघटनांचा उदय झाला. राष्ट्रीय सभेच्या आत्मभानातून स्वदेशी चळवळीने राजकिय, आर्थिक भूमिका बजावली. स्वातंत्र्याच्या लढ्यात सशस्त्र क्रांतीकारी आंदोलनाची लाट ब्रिटीशांच्या धोरणास प्रतिउत्तर देण्यास उदयास आली. इंडियन नॅशनल आर्मीच्या लढ्याने ब्रिटीश प्रशासनास हादरा बसला. भारताच्या इतिहासात अतिजहाल सांप्रदायिकतेची विचार प्रणाली उदयास आली. त्यामुळे मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका इतिहासात नोंद करुन गेली. फाळणीच्या दु:खाबरोबरच भारतीयांना स्वातंत्र्याची प्राप्ती झाली. त्या स्वातंत्र्यास अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नातील भारतीय संविधानाची निर्मिती इत्यादींचीही माहितीसोबतच याची जाणीवही विद्यार्थ्यांस व्हावी त्यासाठीच हे ग्रंथलेखन.

    Bharatacha Itihas (1857-1950)

    295.00
    Add to cart
  • समकालीन भारताचा इतिहास (1947 – 1990)

    “…बऱ्याच वर्षांपूर्वी आपण नियतीशी-भवितव्याशी संकेत केला होता; आणि आज आपल्या प्रतिज्ञापूर्तीचा क्षण आला आहे. आपण आपली प्रतिज्ञा पूर्णांशाने पुरी केलेली नसली तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती पुरी केली आहे. आता मध्यरात्रीचा ठोका जेव्हा पडेल, जेव्हा सारे जग निद्राधीन झालेले असेल; तेव्हा भारतात चैतन्याची आणि स्वातंत्र्याची जाग येईल. इतिहासात असा क्षण क्वचित येतो की ज्यावेळी आपण जुन्या मावळत्या युगातून नव्या युगात प्रवेश करतो जुन्या युगाचा शेवट होतो आणि दीर्घकाळ दडपल्या गेलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला वाचा फुटते. अशा या गंभीर आणि पवित्र प्रसंगी आपण भारताच्या, भारतीय जनतेच्या, एवढेच नव्हे तर अधिक व्यापक आशा मानव जातीच्या सेवेला वाहून घेण्याची प्रतिज्ञा करतो आहोत हे या प्रसंगाला उचित असेच आहे…”

    – पंडित जवाहरलाल नेहरू

    310.00
    Add to cart