• पर्यावरण शिक्षण

    भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणास अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. मनुष्याचे शरीर आप, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी अशा पंचमहाभूतांचे बनलेले आहे हे सत्य भारतीयांनीच सर्वप्रथम जगासमोर मांडले. सजीव आणि निर्जिवाचे अस्तित्वसुद्धा पर्यावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. मात्र आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने त्याच्या हव्यासापायी पर्यावरणाचा आणि पर्यावरणातील साधनसंपत्तीचा अवाजवी वापर करून पर्यावरणाचा समतोल बिघडवला आहे. वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकरण आणि वाढते प्रदूषण यामुळे अलिकडील काही दशकात पर्यावरणाच्या प्रश्नाने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. या सर्व गोष्टींचा मानवाच्या आरोग्यावर आणि त्याच्या शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. पर्यावरण विषयक जागृतीची गरज जगातील सर्वच राष्ट्रांना जाणवू लागली आहे, कारण पर्यावरणाचे संतुलन नष्ट झाल्यास पृथ्वीसारख्या सर्वांगसुंदर ग्रहावरील सजीव सृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल, ही बाब आता लपून राहिलेली नाही. परिणामी जागतिक स्तरावर पर्यावरणाविषयी अधिकाधिक जागृती होत आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब म्हणता येईल.

    Paryatan Shikshan

    225.00
    Add to cart