रशियामध्ये 1920 पासून औद्योगिक मानसशास्त्राला सुरवात झालेली दिसून येते. औद्योगिक परिस्थितीमध्ये कर्मचार्याचे स्वास्थ कसे चांगले राहू शकते या दृष्टीने प्रयत्न केल्या गेले. कर्मचार्याचा एकंदरीत विकास साधला जावा, त्यातही व्यक्तीमत्व विकास व्हावा यासाठी मध्यवर्ती संस्थेतर्फे कार्य केल्या गेले. भारतात 1919 मध्ये औद्योगिक मानसशास्त्राला सुरवात झालेली दिसून येते. या संदर्भाने याच वर्षात मानसशास्त्र विभागाला सुरूवात केल्या गेली. सद्यस्थितीत वाढत्या कामाबरोबर वाढणारा ताण औद्योगिक मानसशास्त्रामधील संशोधनाचा विषय झालेला आहे. कर्मचार्याच्या प्रेरणा वाढलेल्या आहे. त्यामुळे सर्वच दृष्टीकोनातून औद्योगिक मानसशास्त्र उद्योगाच्या एकूण समस्याचे निराकरण करणारे शास्त्र ठरते तसेच उपयोजनात्मक साधन ठरत असल्याचे दिसून येते.
सद्यस्थितीत उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्याचबरोबर त्या उद्योगामध्ये स्थित व्यक्तीत चिंता, ताणतणाव, नैराश्य, संघर्ष, वैफल्य इत्यादीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. यावर उपाय करायचा असेल तर उद्योगामधील प्रत्येक घटकाचा मानवी मनाला, वर्तणुकीला केंद्रस्थानी ठेवून अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणूनच या पुस्तकाचा उद्योगामधील कर्मचारी, व्यवस्थापक, संचालक, पर्यवेक्षक, प्रशिक्षक मार्गदर्शक इत्यादींना याचा फायदा होणारच आहे तसेच उद्योग क्षेत्रात ङ्गकरियरफ करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना तर हे पुस्तक महत्वाचे मार्गदर्शकच ठरणार आहे.
सदरील पुस्तकात औद्योगिक मानसशास्त्र, कार्य मुल्यांकन, कर्मचारी निवड, कर्मचारी प्रशिक्षण, नेतृत्व, प्रेरणा, मनोधैर्य, कार्य समाधान, कार्य ताण, व्यवस्थापन विकास, आंतरवैयक्तीक संबंध, उपभोक्ता वर्तन, जाहिरात, अपघात आणि नियंत्रण, औद्योगिक संघटना या घटकांचा परामर्श घेण्यात आलेला आहे.
Audhyogik Manasshastra