
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत
Rs.275.00आधुनिक भारताचा प्रारंभच मुळात ब्रिटिशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटिशांनी सोबत आणलेली नवीन पुष्ये व नवीन विचार भारतीयांसाठी नवीन होते. त्यातून सामाजिक आर्थिक, धार्मिक सुधारणांना प्रारंभ झाला व या नवीन बदलाचे पडसाद एकूण भारतीय जीवनावर पडले व त्यामुळे विचारमंथनालाही चालना मिळाली. राजा राम मोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधनकालाचा प्रारंभ केला. महात्मा जोतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, नामदार गोखले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरु, अरविंद घोष, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, एम. एन. रॉय, मौलाना आझाद, राम मनोहर लोहिया इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरुप व भविष्यकालीन उपाययोजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करुन वैचारिक मांडणी केली आहे.
आधुनिक भारतीय विचारवंतांनी भारताचे स्वातंत्र्य, भारताचा राजवाद, आंतराष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, भारतातील आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रश्न त्यासाठी करावयाची उपाययोजना, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भारत, शासनाचे परराष्ट्र धोरण, अंतर्गत योजना, राज्यघटना शासन पद्धत इत्यादी संदर्भात वेळोवेळी व्यक्त करण्यात आलेले राजकीय विचार हाच भारताचा राजकीय विचाराचा वारसा आहे व त्याचा आधार घेऊन या देशाची राजकीय जडण-घडण संपन्न झाली असून, भारताचा राजकीय विकास होत आहे. म्हणूनच आधुनिक भारतीय राजकीय विचारांचा अभ्यास हा आवश्यक ठरतो.
Aadhunik Bharatiya Rajkiya Vicharwant

भारतीय गणराज्याचे शासन आणि राजकारण
Rs.325.00अध्ययन विषय केवळ भारतातंर्गत महत्वाचे आहे, असे नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात एखाद्या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धोरणात्मक भूमिका नेमकी कशी आहे? या संबंधाचे आकलन होण्याच्या दृष्टिने त्या त्या देशाचे शासन आणि राजकारण अभ्यासाच्या दृष्टिने महत्वाचे ठरते. शासनाने केलेले अलिकडील बदल वा परिवर्तने सुद्धा अभ्यासाच्या दृष्टिने उपयुक्त असतात आणि या संदर्भाची वस्तुनिष्ठ माहिती व तिचे मूल्यमापन शासनातंर्गत काही महत्वाच्या विभागाद्वारे केले जाते. वास्तविक पाहता भारताने प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीचा अधिकृत स्विकार केल्यामुळे या संविधानिक चौकटीचा अभ्यास केल्याशिवाय आपणास अन्य राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना नीटपणे अभ्यासता येत नाही म्हणून ‘भारतीय गणराज्याचे शासन आणि राजकारण’ अभ्यासणे वा समजून घेणे आजच्या परिप्रेक्ष्यात महत्वाचे आहे.
‘भारतीय राजकारण’ या विचार प्रवाहाचा अभ्यास अनेक अंगाने करण्याचा प्रयत्न काही राज्यशास्त्रज्ञाने केलेला आहे, 1990 च्या प्रारंभी या संदर्भातून अभ्यास करण्याची नवी पद्धत विकसित झाली. ‘राजकीय वर्चस्वाचा’ (Political Domination) अभ्यास, एकपक्षपद्धती, प्रभावी राजकीय नेतृत्व, जागतिकीकरण या संकल्पनाद्वारे भारतीय राजकारणाचा अर्थ व्यापक स्वरूपातून समजून घेण्याचा प्रयत्न झाला. ‘मूलभूत राजकीय प्रक्रिया’ (Fundamental Political Process) समजण्याकरिता भारतीय शासन आणि राजकारण उपयोगी ठरेल.Bharatiya Ganarajyache Shasan and Rajkaran


