सदर पुस्तक लिहिताना लेखकांनी एम.कॉम.-भाग एक द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व घटकाची रचना अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर पुस्तकात मानव संसाधन विकास, मानव संसाधन व्यवस्थापनातील आर्थिक समस्या, मानवी संबंध आणि प्रोत्साहन, आंतरराष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापन, मानव संसाधनातील नवीन संकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाच्या प्रवाहाच्या संकल्पनावर विशेष भर देऊन वाचकांना समजण्यासाठी विविध आकृत्या आणि उदाहरणाचा उपयोग केला आहे. त्यामुळे वाणिज्य विषयातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच फलदायी ठरेल. या अपेक्षेने प्रयत्न करून हे पुस्तक वाचकांच्या हाती देत आहोत. या पुस्तकाविषयी आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया आम्हांला अवश्य कळवाव्यात; त्याचे नेहमी स्वागतच होईल.
Manav Sansadhan Vyavsthapan – II