• समावेशक शिक्षण : शाळा व शिक्षक भूमिका

    ‌‘समावेशक शिक्षण-शाळा व शिक्षक भूमिका’ या पुस्तकात विविध घटकांच्या माध्यमातून अनेक पैलू उलगडून अतिशय सोप्या व समर्पक भाषेची रचना करत या पुस्तकाची निर्मिती केली आहे. यातील प्रत्येक घटकामधील सर्वच मुद्द्यांची मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण असुन शिक्षणाची व्याख्या, शिक्षणाची गरज, शिक्षणाचे प्रकार याच्यावर प्रकाशझोतच टाकला नाही तर शिक्षणक्षेत्रामधील वेळोवेळी झालेले कायदे याची सुद्धा अतिशय सुक्ष्म माहिती या पुस्तकात दिलेली आहे. यातील समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे या घटकामध्ये सुद्धा अतिशय विचारपूर्व लेखन केलेले दिसते. त्यामध्ये मांडलेली शिक्षणाची उद्दिष्टे, शिक्षणाची वैशिष्ट्ये, शिक्षणाची गरज, फायदे, तत्वे व दृष्टिकोन, याचे अतिशय सुंदर विवेचन केलेले आहे. तसेच सर्व समावेशक शिक्षण आणि क्षमता या घटकांमध्ये सुद्धा विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज या प्रत्येक घटकाचे कार्य व जबाबदारी यांची चांगली गुंफण केलेली दिसते.
    प्रामुख्याने अक्षमता असणाऱ्या व्यक्तिसाठींचा 1995 चा कायदा, 1948 मानवी हक्क जाहिरनामा मधील कलमांचे विश्लेषण, बालकांसाठी शिक्षण हा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा मूलभूत हक्क असल्याने मान्य केलेला शिक्षण हक्क कायदा 2009. बालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच 1989, यासह अनेक शासकीय योजनांचे लेखांकन केले गेले आहे. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या विषयाची मांडणी सुद्धा अतिशय सुबक केलेली दिसते.

    Samaveshak Shikshan : Shala V Shikshak Bhumika

    225.00
    Add to cart