• भूगोल आणि पर्यावरणीय आपत्ती

    जगामध्ये पर्यावरणीय आपत्ती कोठेही, कशाही पद्धतीने, कोणत्याही परिस्थितीत निर्माण होतात. याला काही भौगोलिक कारणाबरोबरच मानवही तितकाच जबाबदार घटक आहे. नैसर्गिक आणि मानवी क्रियांमुळे पर्यावरणात अनेक भयंकर स्वरुपाच्या घटना घडून येतात. महाभयंकर, विध्वंसक अशा स्वकरुपाच्या घटनांमध्ये भूकंप, ज्वालामूखी, महाप्रलयकारी पूर, त्सुनामी लाटा, भूमीपात, दरडी कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात. नुकतेच नेपाळमधील भूकंप किंवा पुणे जिल्ह्यातील माळीण या गावावर डोंगर कोसळून संपूर्ण गाव नष्ट होण्याची दुर्घटना यासारखी अनेक उदाहरणे आपत्तीच्या संकटांची तीव्रता लक्षात आणून देतात. वातावरणीय आपत्तींमध्ये अवर्षण, चक्रीवादळे, हिमवर्षाव, ढगफुटी, गारा, हिमवर्षाव, हिमवृष्टी, उष्ण व शीत लाटा, विजा चमकणे यासारख्या नैसर्गिकरित्या निर्माण होणार्‍या आपत्तींमुळे प्राणहानी व वित्तहानी घडून येते. हेतूपुरस्कर काही मानवनिर्मित आपत्ती घडून येतात. त्यामुळे निर्वनीकरण, वाळवंटीकरण, दहशतवाद, बॉम्बस्फोट, दंगली इ. चा समावेश होतो. तसेच जैविक स्वरुपाच्या आपत्तींमध्ये वनस्पतीजन्य व प्राणीजन्य जैविक आपत्तींचा समावेश होतो.

    Bhugol Ani Paryavaraniya Aapatti

    225.00
    Add to cart