भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन असून तिचा प्रारंभ सिंधू संस्कृतीपासून होते. सिंधू संस्कृतीच्या पूर्वीसुद्धा भारतात मानवी संस्कृती अस्त्त्विात होती. सिंधू संस्कृतीनंतर वैदिक संस्कृतीचा उदय व विकास झाला.
भारतभूमीत प्राचीन काळात सम्राट चंद्रगुप्ताने आचार्य चाणक्यांच्या सहकार्याने संबंध भारत भूमीवर एक विशाल मौर्य साम्राज्य उभारले. सम्राट अशोकाने पराक्रम करुनही जगाला शांतीचा संदेश दिला. सारनाथ येथील अशोकाच्या स्तंभावरील चार सिंहाचे प्रतीक, अशोक चक्र स्वतंत्र भारताच्या शासनाने राजचिन्ह मानले. मौर्यानंतर गुप्त, वाकाटक, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, राजपूत, चोल, चेर, पांड्य, पल्लव इत्यादी राजकीय सत्ताधिशांच्या काळात सोपरा, भडोच ह्या प्रसिद्ध बंदरातून भारतीय उत्पादीत माल निर्यात होऊ लागला. अनेक प्रकारचे उद्योग कृषी व्यवसायातून पुढे आल्याने भारत सुवर्णभूमी बनली होती. भारतीय राजकीय सत्ता काळातील अजिंठा व वेरुळ लेणी तर शिल्पशास्त्रातील एक आश्चर्य मानण्यात यतेते. या ग्रंथात राजकीय इतिहासाबरोबरच षङ्दर्शने, उषनिषदे, जैन व बौद्ध धर्म, स्त्रियांची परिस्थिती, कायदा व न्यायव्यवस्था, शिक्षण पद्धती, कला व स्थापत्य, शेती, व्यापार व वाणिज्य, सरंजामशाही, धार्मिक व सामाजिक परिस्थिती आणि साहित्य या विषयांवरही सविस्तर प्रकाश टाकला आहे. प्रस्तुत ग्रंथ पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
Prachin Bharat (Praranbh te 1200)