या देशाची वाटचाल महासत्तेकडे चालली आहे. हे एक सुंदर स्वप्न आहे. मात्र आजच्या घडीला हा देश खर्या अर्थाने सुखी-समृद्ध कसा होणार हा चिंतनाचा मुख्य मुद्दा असला पाहिजे आपला देश ‘कृषी-प्रधान’ आहे हे भावनिक विधान किती काळ चालविणार, जागतिकीकरणात आपली 90% शेती संपत चालली आहे. ‘शेतकर्यांच्या आत्महत्या’ काळजाला रक्तबंबाळ करणार्या आहेत बेरोजगारांच्या फौजा, उपाशी पोटांची वाढत जाणारी संख्या, शेतीचे नापिकीकरण, या सर्व समस्यांवर सक्षम उपाय शोधून काढले तरच शेती, शेतकरी व देश सावरेल, यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच, गावागावात सेंद्रीय शेतीचे महत्व, वनराई बंधारे, म. फुलेंची पाणी व शेतीविषयक धोरण, सक्षम बियाणांचे जाळे विणावे लागेल. चांगले उपक्रम चिरंतर राबवावे लागतील. श्रमाला, शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सर्वांनाच झोकून द्यावे लागणार आहे. पिढ्यान्पिढ्या पोसणार्या शेतीला समृद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सर्वांनाच करावी लागणार आहे. तरच या देशाची वाटचाल महासत्तेकडे होईल. मग कोणाची झडती. घेण्याची गरज भासणार नाही.
Zadti Pidhipestar Pyadematchi