-
बाल्यावस्था आणि विकास
प्राचीन काळापासून ते आजपर्यंतच्या विविध ग्रंथामधून बालसंगोपनाचे व बालविकासाचे विविध दाखले मिळतात. विसाव्या शतकात पाश्चिमात्य राष्ट्रात बालविकासासंबंधी शास्त्रीय गती मिळाल्याचे दिसून येते. बालकाचा विकास ही संकल्पना बालकाच्या जन्मापासून त्याच्या किशोरावस्थेच्या अखेरपर्यंत होणार्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तिच्या विकासाचा वेग सारखा असत नाही. विकासाचे ठराविक टप्पे असतात. प्रत्येक बालकाचे अनन्यसाधारणत्व लक्षात घेऊनही विकासाच्या पूर्वपेक्षित मापदंडानुसार ह्या विचारप्रक्रियेचा स्तर, दर्जा आणि गती असत नाही. कारण ह्या विकासात्मक बदलावर गर्भावस्थेतील जैविक घटकांचा आणि घटनांचा प्रभाव असू शकतो. मुलांचा विकास योग्य दिशेने होत आहे की नाही हे अजमावण्यासाठी त्यांच्या वर्तनाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यासंबंधी अभ्यास करणे गरजेचे आहे. मूल जन्माला आल्यापासून भोवतालच्या परिस्थितीशी/ वातावरणाशी त्याला समायोजन साधावे लागते. आपल्या गरजा पूर्ण करून घ्याव्या लागतात. यामध्ये येणार्या यश-अपयशावर त्याचे वर्तन निश्चित होते. प्रस्तुत ग्रंथात या सर्व बाबींचा उल्लेख सविस्तरपणे केलेला आहे.
Balyavastha Ani Vikas