सकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.
Sakaratmak Manasashatra