• महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास

    संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.
    सदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.

    375.00
    Add to cart