• आधुनिक सामान्य मानसशास्त्र

    19 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. मानसशास्त्राचे आजचे स्वरुप हे अत्यंत शास्त्रीय दिसून येते. मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी जर्मनीतील लाईपझिंग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा (1879) स्थापन करून मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास आणि वर्तनासंदर्भात अनेक पैलूंची माहिती मानसशास्त्रातील संशोधनामुळे आपल्याला मिळत आहे; ती माहिती शास्त्रशुद्ध स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदरील पुस्तकाचे प्रयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसशास्त्रात जे वेगाने बदल होत आहे त्यांचीही दखल घेतली गेली आहे. पुस्तकातील भाषा साधी, सोपी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, मानसशास्त्राचे वाचक तसेच सर्वांना निश्चितच उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.

    Adhunik Samanya Manasshastra

    195.00
    Add to cart
  • मानवी विकासाचे मानसशास्त्र

    व्यक्तीच्या गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत होणार्‍या शारिरीक मानसिक व इतर विकासाचा केलेला शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानवी विकासाचा अभ्यास होय. घडून येणारे बदल हे उघड्या डोळ्यांनी सहजपणे दिसून येत नसले तरी ते सातत्याने सुरू असतात. बालपणी मात्र त्यांचा वेग कमालीचा असतो. साधारणपणे विकासाची गती व दिशा एकच असली तरी त्यामध्ये व्यक्ती भिन्नता दिसून येते आणि व्यक्तीच्या विकासावर समाज, संस्कृती, अनुवंश परिवेश ह्या घटकांचाही मोठा प्रभाव दिसून येतो. मूळात मानवी विकास ही संकल्पना अत्यंत व्यापक अशी आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार विविध अडीअडचणींना आणि समस्यांना समर्थ्यपणे तोंड देत व्यक्ती आपला विकास साधत असतो. प्राप्त परिस्थितीशी समायोजन प्रस्थापित करत असते. अत्यंत कठीण परिस्थितीतही मानव यशाच्या उच्च शिखरावर जातांना दिसून येतो.

    बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना मानवी विकास प्रक्रियेच्या बाबतीत संशोधनातून माहिती मिळावी म्हणूनच सदरील पुस्तक लेखनाचे प्रयोजन.

    Manavi Vikasache Manasshastra

    275.00
    Add to cart
  • मूलभूत व सामाजिक मानसशास्त्र

    मानसशास्त्र हे वर्तनाचा आणि मानसिक क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करणारे प्रगत असे शास्त्र मानले जाते. मानसशास्त्राचा कसा विकास होत गेला, मानसशास्त्राबद्दल समाजात असणारे अनेक गैरसमज त्यापैकी एक म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र आहे का? आजही अनेक विचारवंत या शास्त्राला शास्त्र मानावयास तयार नाही. मानसशास्त्र देखील एक प्रगत असे शास्त्र आहे. तसेच वेगवेगळ्या कालखंडात मानसशास्त्राचा अभ्यास कशा पद्धतीने झाला, मानसशास्त्राच्या विविध शाखा आणि महत्वाच्या अभ्यास पद्धतीचा अभ्यास करणार आहोत.

    सदर पुस्तकातील पहिल्या तीन प्रकरणात मानसशास्त्राचा परिचय, बोधात्मक प्रक्रिया व प्रेरणा व्यक्तीमत्व आणि बुद्धीमत्ता या तीन प्रकरणातून जास्तीत जास्त व सखोल माहिती उदाहरण, प्रयोगासह देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने नवीनच लागू केलेल्या व अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच सामाजिक मानसशास्त्राची ओळख, वैयक्तीक पातळीवरील प्रक्रिया समुह गतिकी या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक मानसशास्त्राची ओळख या प्रकरणात भारतातील सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास व वर्तनाचा बोधात्मक दृष्टीकोन यासारख्या नवीन घटकांचा सविस्तरपणे उल्लेख केला आहे. तसेच दुसर्‍या प्रकरणात आक्रमकता कारणे आणि आक्रमकता प्रतिबंध यासारख्या नवीन घटकांसह नियंत्रणांची साधने यांचाही उहापोह करण्यात आला आहे. समूह गतिकी या प्रकरणात समुहात सहभागी होण्याचे फायदे सहकार्य व संघर्ष आणि सोबत नव्यानेच मदत वर्तनात वाढ कशी करावी या सारखे मुद्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

    Mulbhut v Samajik Manasshastra

    195.00
    Add to cart