
संशोधन पद्धती – मूलभूत संकल्पना
Rs.150.00अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे जीवनाच्या आर्थिक व्यवहारास मार्गदर्शक ठरतील असे नियम किंवा सिध्दांत मांडण्यासाठी आर्थिक माहिती किंवा तथ्ये संकलित करणे, ती शिस्तबध्द स्वरूपात मांडणे, तीचे शास्त्रीय विश्लेषण करणे, निरीक्षण व अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून अनेकविध कारणांचे तात्कालिक व अंतिम परिणाम काय होतील हे निश्चित करणे.
संशोधन पद्धती मूलभूत संकल्पना या पुस्तकात संशोधन परिचय/प्रस्तावना, संशोधन आराखडा, तथ्य संकलन/माहिती संकलन, सामग्रीचे/माहितीचे विश्लेषण, केंद्रिय प्रवृत्तीची मापके, संशोधन अहवाल या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदरील पुस्तकाची मांडणी अत्यंत साध्या पद्धतीने केली असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.Sanshodhan Paddhati Mulbhut Sankalpana

