‘भारतीय आर्थिक पर्यावरण’ यात सेवाक्षेत्रातील आर्थिक पर्यावरण यामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, विमा, बँकींग, सेवा क्षेत्रापुढील आव्हाने, बँकिंग पर्यावरण यामध्ये बँक, बँकांची कार्ये, बँकेची बदलती रचना, खाजगी, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती आणि व्यवहार करण्याची प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्रय निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास इत्यादी घटकांचा विचार केला आहे. त्यांचा आर्थिक विकासावर होणार्या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू विचारात घेतलेला आहे. सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अलिकडील अद्ययावत सांख्यिकीय आकडेवारी व माहितीचे संदर्भ दिले आहेत. भारताची आर्थिक पाहणी, ठइख चे वार्षिक अहवाल, संकेतस्थळावरील उपलब्ध असलेल्या माहितीचा अवलंब केला आहे. त्यामुळे हे पुस्तक अर्थशास्त्राचे विद्यार्थी व अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे लिखाण केले आहे.
Bharatiya Aarthik Paryavaran (Bhag 2)