• पर्यावरण भूगोल

    पर्यावरण ही निसर्गाची एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. पर्यावरणातील सजीव, निर्जीव, पाणी, हवा, माती या सर्व घटकांमध्ये एक क्रमबद्ध व व्यवस्थित संघटन असते. मानव हा स्वत: पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. मानव व पर्यावरण यांच्यात अतूट असे परस्पर संबंध पृथ्वीच्या व मानवाच्या निर्मितीपासूनच निर्माण झालेले आहेत. किंबहुना अनुकूल पर्यावरणातच मानवाचा विकास होऊ शकतो. पर्यावरणातील विविध घटकांमध्ये परस्पर क्रिया-प्रतिक्रिया सतत सुरू असतात व या क्रिया-प्रतिक्रियांचे नियमन निसर्गत:च होत असते. पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये परस्पर आंतरक्रिया सतत सुरू असतात. पर्यावरणातील हे सर्व घटक निसर्गनियमानुसार कार्य करत असतात. मानव हा पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये एक सर्वश्रेष्ठ व बुद्धिमान घटक आहे. मानवाच्या गरजा अनंत असून त्या पूर्ण करण्यासाठी मानव पर्यावरणातील घटकांचा वापर करतो. मानवाच्या वाढत्या व अतिरेकी हस्तक्षेपामुळे पर्यावरणात असंतुलन निर्माण होऊन पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. पर्यावरणाची गुणवत्ता ढासळत आहे. विविध पर्यावरणीय घटकांचे प्रदूषण होत आहे. संपूर्ण निसर्गचक्र प्रभावित होत आहे. या सर्व घटनांना मानव स्वत: जबाबदार असून त्याचे दुष्परिणाम त्यालाच भोगावे लागत आहेत. व्यक्तीला बालपणापासून यासंबंधीचे ज्ञान मिळल्यास तो पर्यावरणासंबंधी अधिक काळजी घेईल. मानव व पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाच्या दृष्टीने पर्यावरण अभ्यास महत्त्वपूर्ण आहे.

    Paryavaran Bhugol

    175.00
    Add to cart
  • भारताचा भूगोल

    भारत हा एक प्राचीन संस्कृती व वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा लाभलेला महान देश आहे. भारताचा इतिहास गौरवशाली आहे. भारत हा विशाल खंडप्राय देश असून विविधतेने नटलेला आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय, दक्षिणेस विस्तृत हिंदी महासागर, पूर्वेस बंगालचा उपसागर व पश्चिमेस अरबी समुद्र शिवाय अंतर्गत भागातील भूरचनेतील विविधता यामुळे भारताचे हवामान वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतात जगातील बहुतेक सर्व प्रकारच्या हवामानाचे आविष्कार पाहायला मिळतात. पश्चिम आशिया व पूर्व आशियाच्या मध्यभागात भारत स्थित असून हिमालय पर्वताच्या दक्षिणेस हिंदी महासागरपर्यंत पसरलेला भारत हा आशिया खंडाचा एक उपखंड समजला जातो. भारताचा लोकसंख्या बाबतीत जगात चीन नंतर दूसरा क्रमांक लागतो. भारतातील खनिज व शक्ती साधनसंपत्तीचे वितरण विषम झालेले आहे. भारताचे शेजारील देशांदरम्यान भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहेत.

    Bharatacha Bhugol

    275.00
    Add to cart
  • राजकीय भूगोल

    एखाद्या राज्यातील किंवा राष्ट्रातील मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय संबंध, आर्थिक विकास, आर्थिक क्रिया, त्या राज्याची किंवा राष्ट्राची समृध्दता, संपन्नता भौगालिक वातावरणाद्वारे प्रभावित, नियंत्रित व निर्धारित होत असते. राजकीय भूगोलाचा अभ्यास प्राचिन काळापासुन केला जातो. ग्रीक व रोमन कालखंडात राज्य भौगोलिक वातावरणाशी संबंधित असल्याचे मानले जात असे. पृथ्वीतलावरील भौगोलिक भिन्नतेचा तत्कालीन राज्यांशी घनिष्ठ संबंध असतो याची ग्रीक व रोमन राज्यकर्त्यांना व विचारवंतांना जाणीव होती. पहिल्या व दुसर्‍या महायुद्धाच्या काळात राजकीय विचार व डावपेच, लष्करी व संरक्षण विषयक धोरण, युध्दनिती, इत्यादी निश्चित करतांना भौगोलिक पर्यावरणाचा अभ्यास केला गेला. तेव्हांपासुन राजकीय भूगोलाच्या विकासाला चालना मिळाली. राजकीय भूगोल ही भूगोलाची महत्वपुर्ण व विकसित आणि स्वतंत्र शाखा म्हणून अभ्यासला जातो. राजकीय भूगोल हा विस्तृत व बहुविध पैलु असलेला विषय आहे. मानवाच्या विविध प्रकारच्या राजनीतीचा व राजपध्दतीचा स्थळ व क्षेत्र या संदर्भातील आविष्कार राजकीय भूगोलात अभ्यासला जातो. पृथ्वीवर निरनिराळया प्रदेशातील भौगोलिक स्थिती व पर्यावरण वेगवेगळे आहे. साहजिकच निरनिराळ्या भौगोलिक प्रदेशातील राजकीय पध्दती, शासन प्रणाली, राजनिती वेगवेगळया प्रकारची आढळते. यामुळेच विविध राजकीय प्रदेश निर्माण झालेत. अशा विभिन्न राजकीय प्रदेशांचा राजकीय दृष्टीकोनातुन भौगोलिक घटकांच्या संदर्भातील अभ्यास राजकीय भूगोलात केला जातो. थोडक्यात, घटक व राजकारण यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास म्हणजे राजकीय भूगोल होय. राजकीय भूगोलात राजनीती व भौगोलिक पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्रापेक्षा राजकीय भूगोल भिन्न असल्याचे प्रमुख कारण, म्हणजे राष्ट्रातील ‘क्षेत्रीय विभिन्नता’ हा घटक आहे. जगात ज्या विविध राज्यसंस्था निर्माण झाल्या आहेत त्यांची राजनीती, शासनपध्दती, राजकीय विचार, राजकीय पक्ष, राजकीय धोरण, राजकीय प्रणाली, परराष्ट्रीय धोरण वेगवेगळी आहे. कारण या सर्वांवर त्या त्या राज्यसंस्थेच्या भूप्रदेशातील विविध भौगोलिक घटकांचा जसे राज्यसंस्थेचे स्थान, विस्तार, भू रचना, हवामान, लोकसंख्या, जलसंपत्ती, वनस्पती, प्राणीसंपत्ती, मृदा, खनिज संपत्ती इत्यादींचा परिणाम होतो. ह्या सर्व भौगोलिक घटकांमध्ये प्रदेशपरत्वे भिन्नता आढळते. म्हणूनच वेगवेगळया राज्यसंस्थांची निर्मिती झाली आहे. ह्या सर्वांचा अभ्यास राजकीय भूगोलात केला जातो.

    Rajkiya Bhugol

    185.00
    Add to cart
  • लोकसंख्या भूगोल

    लोकसंख्या भूगोल ही अगदी अलीकडे विकसित झालेली ज्ञानशाखा असून, मानव हा अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. या विषयात मानवाबरोबरच मानवी जीवनाशी संबंधित प्राकृतिक व अप्राकृतिक अशा घटकांचाही अभ्यास समाविष्ट होतो. प्रदेशानुसार प्राकृतिक घटकांमध्ये विविधता आढळते. या प्राकृतिक/भौगोलिक विविधतेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिरणाम त्या त्या भौगोलिक प्रदेशात वास्तव्य असणार्‍या मानवी समुहाच्या जीवनावर होत असतो. यामुळेच भिन्न भिन्न हवामान प्रदेशांत राहणार्‍या मानवाच्या जीवनातही विभिन्नता आढळून येते. तसेच लोकसंख्येचे वितरणही सर्वत्र सारखे नाही. कारण लोकसंख्येच्या क्षेत्रीय वितरणावर प्राकृतिक, सांस्कृतिक व आर्थिक घटकांचा परिणाम होतो. या घटकांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. यामुळेच लोकसंख्या भूगोलाचे स्वरुप बहुव्यापी व बहुस्पर्शी असे असल्याचे दिसून येते. लोकसंख्या भूगोल गतिमान व परिवर्तनशील असा अभ्यासविषय आहे. या विषयात प्रामुख्याने मानव व त्यासंबंधित पर्यावरणीय घटकांचा अभ्यास केला जातो. हे दोन्ही घटक गतिमान व परिवर्तनशील आहेत. पृथ्वीवर सतत काही ना काही घडामोडी होत असतात. या घडामोडींचा परिणाम पर्यावरणावर होत असतो. मानव स्वत:च गतिमान व परिवर्तनशील प्राणी आहे. मानव आपल्या सुप्त गुणांचा वापर नेहमी करत असतो. त्यामुळेही भौगोलिक व अभौगोलिक बदल पर्यावरणात होत असतात. या बदलांचा परिणाम मानवी जीवनावर होतो. लोकसंख्याविषयक घटकांमध्येही नेहमी बदल होतात. या सर्व प्रकारच्या बदलांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. म्हणूनच लोकसंख्या भूगोलाचे स्वरुप गतिमान व परिवर्तनशील असे आहे.

    Lokshnkhya Bhugol

    150.00
    Add to cart