महाराष्ट्र राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र असे प्रादेशिक विभाग आहेत. यामधील उत्तर महाराष्ट्रातील उत्तरेकडील प्रदेश खान्देश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशाचा प्रादेशिक भूगोल सर्वांना परिचित व्हावा, त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा या उद्देशाने खान्देशाचा भूगोल हे पुस्तक लिहिले आहे.
खान्देशचा भूगोल या पुस्तकात खान्देशातील म्हणजे जळगांव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील भौगोलीक, प्रशासकीय, राजकीय, कृषी, उद्योग, सामाजिक व सांस्कृतिक आणि पर्यटन विषयक माहिती दिलेली आहे. खान्देशातील संपूर्ण माहिती ही संदर्भ पुस्तके, अभ्यास, वाचन, प्रत्यक्ष प्रवास, मुलाखत, संकलन, वर्तमान पत्रे व इंटरनेट सुविधा याच्या आधारे प्राप्त करून पद्धतशीर गुंफण्याच्या प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील माहिती विद्यार्थी, शिक्षक, वाचक व संशोधक यांना फार उपयुक्त व फायदेशीर ठरेल.
Khandeshcha Bhugol