संरक्षण पत्रकारिता या पुस्तकात संरक्षण शास्त्र आणि पत्रकारिता हे दोन्ही विषय संतुलीतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विषयाचे आकलन चटकन व्हावे म्हणून या ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या भाषेत, मुद्देसूद केलेली आहे.
सदरील पुस्तकात संरक्षण पत्रकारितेचा आढावा घेतला आहे. संरक्षण मंत्रालयापासून संरक्षण संघटना, संरक्षणावरील संसदीय नियंत्रण व विविध सेनाविभागांची माहिती देण्यात आली आहे. सुरक्षा व परराष्ट्रीय धोरण तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा स्थितीचे अवलोकन केले आहे. संरक्षण परिभाषा व विविध समारंभ, सेनादलातील अलंकरणे व पदके याविषयी माहिती दिली आहे. संरक्षणविषयक बातम्यांचे प्रकार, स्त्रोत आणि संरक्षण पत्रकाराचे कार्य व स्वरुप याचे विवेचन केलेले आहे. वृत्त, वृत्तांत व लेखाचे लेखन करण्याची पद्धती व स्वरुप स्पष्ट करतांना संरक्षण पत्रकाराने लेखन करतांना घेण्याच्या दक्षतेबद्दल मार्गदर्शन केले आहे. संरक्षण लेखनातील अडथळे, नैतिकता, कायदे व संरक्षण पत्रकारितेतील समस्यांचा उहापोह केलेला आहे. संरक्षण पत्रकाराची साधने व पत्रकारिता करतांना साह्यभूत ठरणार्या बाबींवर प्रकाश टाकलेला आहे. संरक्षण पत्रकारितेचे कार्य स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेत माध्यमांच्या भूमिकेचे विश्लेषण केले आहे. परिशिष्टात संरक्षण पत्रकारांना कामात येतील अशा बाबी समाविष्ट केल्या आहेत. हे पुस्तक पत्रकार, पत्रकारितेचे व संरक्षणशास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
Sanrkshan Patrakarita