• शारीरिक शिक्षणात मानसशास्त्राचे मार्गदर्शन व मूल्यमापन

    खगोल, भौतिक, रसायन या शास्त्रांप्रमाणेच मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे. परंतु ते इतर शास्त्रांपेक्षा निराळे आहे. मानसशास्त्र हे मनुष्याशी निगडित आहे. इतर शास्त्रांच्या मानाने, हे शास्त्र नुकतेच म्हणजे 1000-2000 वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. पण आज असे कोणतेही शास्त्र नाही की ज्याचा संबंध मानसशास्त्राशी नाही. सर्व क्षेत्रांत या शास्त्राची व्याप्ती झाल्याची आढळते. क्रीडा मानसशास्त्र ही क्रीडा तंत्रज्ञानास उपयुक्त ठरणारी मानसशास्त्राची एक उपयोजित शाखा आहे. क्रीडा मानसशास्त्राच्या दृष्टीने मुक्त खेळ व हालचालींमधून व्यक्ती आपल्या शक्तीबरोबर भावभावनांचा आविष्कार करते. शारीरिक शिक्षण व खेळ हे मानसशास्त्राच्या केवळ मानवी आचरणाशीच संबंधित नाही, तर मानसशास्त्रात बालक, प्रौढ, वृद्ध, स्त्रिया, पुरूष अशा समाजातील सर्व घटकांच्या वागणुकीशी संबंध येतो. शारीरिक शिक्षणाच्या स्थितीत फार मोठे परिवर्तन घडून आलेले आहे. अनेक प्रकारच्या स्पर्धांमुळे त्यांचे महत्त्व वाढतच आहे. महत्त्वाबरोबर त्यांच्या समस्याही वाढत आहेत. खेळाडूंचे प्रशिक्षणानंतर होणार्‍या जय-पराजयांनाही कसे पचवावे व यासाठी मनाची वृत्ती कशी असावी म्हणजेच यश आल्यामुळेच अगदीच हुरळून जाऊ नये व अगदी अपयश आले तरी नाराज होऊन खेळाविषयी नकारात्मक विचार निर्माण होऊ नये असा विश्वास क्रीडामानसशास्त्र देते. आधुनिक क्रीडा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी क्रीडामानसशास्त्र ही अत्यंत उपयुक्त अशी मानसशास्त्राची शाखा आहे. त्यामुळे क्रीडामानसशास्त्र हे अलीकडे स्वतंत्र असे महत्त्वाचे शास्त्र बनू पहात आहे.

    Sharirik Shastrat Manasshastrache Margdarshan v Mulymapan

    195.00
    Add to cart