होय. मी ही म्हणेल, माझी सावित्रीमाई जगाची शिलेदार आहे. आणि आम्हा स्त्रीजातीसाठी मिळालेली अमूल्य अशी जीवनदायिनी आहे. माझी सावित्रीमाई म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी आपल्या देशात पहिली शाळा सुरू करणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या पत्नी या भारताची पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका, कवयित्री, साहित्यिक, भारताची पहिली धर्मपरिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारणारी महिला म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा इतिहास सर्वांना आणि सर्वच वाचकांना ज्ञात आहे. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य सर्वांना माहित आहे. तरी पण ‘माझी सावित्रीमाई आणि आजची स्त्री’ या पुस्तकात काय वेगळ असणार. असे असंख्य प्रश्न तुम्हा वाचकांना नक्कीच पडले असणार.
Mazi Savitrimai Aani Ajachi Stree