नवीन अभ्यासक्रमावर आधारित संशोधन पद्धती व बौद्धिक संपदा हे पुस्तक विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय? संशोधन कसे व का करावे? संशोधनाच्या पद्धती कोणत्या? याचे सविस्तर ज्ञान देण्यास उपयुक्त असून संशोधन करताना संशोधकाने कोणत्या नियमाचे पालन करावे? कोणत्या बाबी लक्षपूर्वक हाताळाव्या याचे सविस्तर ज्ञान बौद्धिक संपदा या प्रकरणाद्वारे करून देण्यास पूरक आहे. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच पीएच.डी. करताना संशोधनाबद्दल जे ज्ञान संशोधकांना आवश्यक असते. शोध प्रबंध तयार करताना कशाप्रकारे तयार करावा. प्रबंध तयार करताना आवश्यक घटक याची पूर्तता कशी करावी याविषयीचे ज्ञान, या सर्वांच्या पायऱ्या, याचे पूर्वज्ञान व पूर्वतयारी या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून होणार असून सदर पुस्तिका विद्यार्थ्यांना, संशोधकांना तसेच प्राध्यापकांकरिता उपयुक्त ठरणार आहे.