
मोबाईल, व्हाट्सअप आणि फेसबुक मॅसेज
Rs.150.00आजच्या धळपळीच्या जीवनात थोडा वेळ करमणूकीत जावा यासाठीच हा लेखनप्रपंच. सगळ्याच लोकांचे व्हाट्सअप आणि फेसबूक असेल असे नाही. असले तरी ते नेहमी वापरतात असे नाही. त्यामुळे त्यांना मोबाईल, व्हाट्सअप आणि फेसबुकवरील विविध मॅसेजचा आनंद उपभोगता यावा यासाठी मोबाईल, व्हाट्सअप आणि फेसबुक मॅसेज हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.
गेल्या 10 वर्षापासून मी मोबाईल, व्हाट्सअप आणि फेसबुकवर आलेल्या विविध मॅसेजचे अतिशय परिश्रमपूर्वक संकलन केले. हे विविधरंगी, विधिढंगी मॅसेज मला अतिशय आवडले. भावले. हे विविध मॅसेज आहे त्याच स्वरुपात मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. हे विविध मॅसेज मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत आहे. विविध गंमतीदार जोक्स, आदर्शवादी सुविचार, विविध बोधपर, हास्यपूर्ण व गंभीर गोष्टी, सण-उत्सवादी प्रसंगी घेतले जाणारे उखाणे तसेच चारोळ्या, मेंदूला झिनझिण्या आणणारी विविध कोडी, धावपळीच्या आयुष्यातील दैनंदिन गंमतीदार, हसवणारे प्रसंग, प्रेमाची शेरोशायरी या सर्वांचा समावेश सदरील पुस्तकात केलेला आहे. याचा फायदा सर्वांना होईलच.
सर्वजण आवडीने वाचतील…. अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत…
सर्वांनी वाचावे असे मनोरंजनपर, गंमतीदार पुस्तक!
Mobile, WhatsApp and Facebook messages

सेट/नेट भूगोल (पेपर 2 व 3)
Rs.595.00भूगोल विषयाच्या सर्वच उपशाखांची दर्जेदार व अचूक माहिती असलेले ग्रंथ प्रत्येक विद्यार्थ्याला विकत घेवून अभ्यासणे तसेच एकाच ग्रंथालयात ही सर्व ग्रंथसंपदा उपलब्ध असणे दुरापास्त आहे. तसेच भूगोलशास्त्रातील बहुसंख्य ग्रंथ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे नेट/सेट/जे.आर.एफ. भूगोल विषयाची तयारी करणार्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांंना अनेक अडचणींंना तोंंड द्यावे लागते. या सर्व अडचणींंचा सखोल विचार करुन एकाच ग्रंथात नेट/सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या भूगोल विषयाच्या सर्वच उपशाखांची माहिती प्रासादात्मक भाषेत अचूकपणे उपलब्ध करुन देणे हा या पुस्तक निर्मितीचा प्रमुख उद्देश आहे. सदर पुस्तकात भूगोलशास्त्राच्या विविध शाखांतील संकल्पना व पाठयांश मांडणी अभ्यासकाला सहज अवगत होईल अशी करण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच आवश्यक त्या संकल्पना आकृतींंच्या साहाय्याने स्पष्ट केलेल्या असून त्या स्वत:लेखकांनी संगणकावर तयार केलेल्या आहेत. त्यामुळे त्या अधिक अचूकपणे तयार केलेल्या आहेत. सर्वांंना ज्ञात असलेल्या भूमीच्या भूगोलाची व्याप्ती अतिशय व्यापक असून त्यातील पाठयाशाची मांडणी मर्यादित पृष्ठांत करणे ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे सदर पुस्तकात नेट/सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्वच घटक विस्ताराने स्पष्ट करण्याऐवजी स्वयंअध्यापनानुभव व नेट/सेट परीक्षेतील प्रश्नांचे स्वयंअध्ययन व अवलोकन करुन अचूक पध्दतीने संक्षेपाने स्पष्ट करण्यावर भर देण्यात आलेला आहे. प्रत्येक घटका नंतर नेट/सेट प्रश्नसंचातील काठीण्य पातळीचा विचार करुन वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांंना स्वअध्ययन करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांंचा प्रश्नसंच सोडविण्याचा सराव व्हावा म्हणून 900 प्रश्नांचा समावेश असलेले चार सराव प्रश्नसंचासह नेट व सेट परीक्षांचे दुसर्या व तिसर्या पेपरचे प्रश्नसंच उत्तरांसह समाविष्ट केले आहेत.
Set-Net Bhugol (Pepar 2 V 3)


