संगिता धोटे यांचा ‘युगस्पंदन’ हा जवळपास सर्वांगीण विषयांना स्पर्श करणारा संपादित काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे; त्याबद्दल संगिताचे अभिनंदन! महाराष्ट्रातील नानाविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कवी-कवीयित्रींना एकत्र आणून बांधण्याचे काम तिने ‘युगस्पंदन’च्या माध्यमातून केले आहे. निसर्ग, शेती, बलत्कार, बाप, हुंडाबळी, दुष्टप्रथा, मन, पाऊस, भारतमाता, वैधव्य, शेतकरी, पत्रकार यांसारखे विषय कवींच्या काव्यातून प्रामुख्याने अभिव्यक्त झाले आहे.
स्त्रीवर्ग मोठ्या प्रमाणात साहित्याच्या प्रांतात भावनांना शब्दांच्या माध्यमातून मोकळा करीत आहे याची साक्ष या काव्यसंग्रहातून पटते. स्त्रीच्या दैनंदिन जगण्यातील बारकाव्यासोबतच तिचा जीवनसंघर्ष, शृंगार, लेकीचं नातं, बोहणी यांसारखे संवेदनशील विषय यामध्ये येतात. शिवाय पर्यावरण, गतकाळाच्या आठवणी, राजकारण, शब्दांचे श्रेष्ठत्व, शिक्षण आणि आदिवासींचे जगणे यांसारखे अनेक विषय यामध्ये आल्यामुळे काव्यसंग्रह वाचनिय बनला असे म्हणायला हरकत नाही.
संगिताच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा!
– डॉ. अनंता सूर
Yugsapandhan