एकविसाव्या शतकातील येणारा काळ हा जातीय, धार्मिक, वांशिक भेद तसेच सांस्कृतिक भेद याने प्रभावित होत आहे. परिणामी राज्या-राज्यांमध्ये, देशा-देशांमध्ये प्रचंड संघर्षाचे चित्र निर्माण होत आहे. सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध हे त्या आक्रमक संघर्षाचेच प्रतिबिंब आहे. मानवी मनातील संघर्ष केवळ समतेच्या विचारानेच थोपवता येऊ शकतो. समतेच्या अनुषंगाने एक व्यापक समाज मन तयार होण्यास नक्कीच मदत होईल. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये समतेचे विचार रुजवले गेले तर येणारी पिढी ही जातीभेद, धर्मभेद व संस्कृतीभेद यांच्या पलीकडे जाऊन विचार करणारी व राष्ट्रीय एकात्मता जोपासणारी तयार होईल यात तिळमात्र शंका नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मुल्यांची जोपासना करून प्रस्ताथित समाज व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या, समतेची मशाल हाती घेऊन अखिल विश्वाच्या कल्याणासाठी स्वतःच्या देहाची, यत्कींचीतही तमा न बाळगता सर्वस्वाचा ज्यांनी त्याग केला, त्या महान व्यक्तिंची माहिती सदरच्या छोटेखानी पुस्तकात दिलेली असून विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्तम संस्कार निर्माण होण्यास प्रस्तुत पुस्तक सिद्ध होणार आहे.
Samateche Shiledar