• वाचन संस्कृती आणि बदलते आयाम

    डॉ. अनिल नानाजी चिकाटे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत असून ग्रंथालय व माहितीशास्त्र या क्षेत्रात तीस वर्षाचा अनुभव आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय नामांकित नियतकालिकेतून 20 संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये 30 संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. मलेशिया, थायलंड, श्रीलंका, शांगाय इत्यादी देशात त्यांनी परिषदामधून लेख प्रस्तुत केलेत. तसेच तीन ग्रंथ देखील प्रकाशित केले आहेत. आतापर्यंत यांच्या मार्गदर्शनातून 12 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्राप्त झाली आहे. णॠउ व खउडडठ या नामवंत संस्थेचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. क.ब.चौ. उ.म.वि. जळगाव येथील महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र तसेच खान्देश पुराभिलेखागार व संग्रहालयाचे ते प्रमुख आहेत. कला व मानव्यशाखा प्रशाळेचे संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. ग्रंथालयशास्त्र विषयातील अनेक संघटनांचे आजिव सदस्य आहेत.

    हितेश गोपाल ब्रिजवासी हे खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या क्षेत्रात कार्यकरण्याचा त्यांचा सात वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव असून. प्रकाशन क्षेत्रात सुध्दा त्यांची अनेक कार्ये आहे, यात त्यांनी लिहिलेल्या 3 ग्रंथांचा आणि 30 पेक्षा जास्त शोधनिबंधाचा समावेश होतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध देखील सादर केले आहे तसेच राष्ट्रीय परिषदेत Research Scientist Award for Best Research Paper या पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले आले आहे. वर्तमानपत्रात देखील त्यांचे अनेक लेख सातत्याने प्रकाशित होत असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधपत्रीकेच्या संपादक मंडळावर देखील त्यांची निवड करण्यात आली असून विविध मासिक व नियतकालिकांच्या संपादनाचे कार्यसुध्दा त्यांनी केले आहे. ग्रंथालय भारती, नागपूर या संस्थेचे ते जळगाव जिल्ह्याचे सचिव असून या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सतत कार्यरत असतात. यांच्या कार्याबद्दल Smart Librarian या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

    डॉ. शर्मिला विठ्ठलराव गाडगे हे डी.डी.एस.पी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय एरंडोल येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत असून त्यांना ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रात कार्य करण्याचा दहा वर्षांचा अनुभव आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे महाविद्यालयात समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील LIS नियतकालिकेत आतापर्यंत दहा लेख प्रसिद्ध असून एका ग्रंथाचे संपादक लेखिका आहेत. राष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदामध्ये लेखांचे वाचन केले आहे. कबचौ उमवि अंतर्गत प्राप्त संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. ग्रंथालय आणि माहिती शास्त्रातील अनेक संघटनांच्या सभासद आहेत.

    Vachan Sanskruti Ani Badalte Ayam

    185.00
    Add to cart