-
Poetry and Poetic Devices
As we know English is a World’s global language, and it is the most spoken language in the World. Today it dominates in every field. It’s popularity is increasing day by day in this era of science and technology.
We feel great pleasure in presenting this book ‘Poetry’ to the readers. We are sure you will feel happy to read this book. This book is suitable for teachers, students and learners. Teachers will be enlightened about What poetry is? And how to teach it to the students.
Students will get information about poetry and poetic devices through this book.
”Poetry is a type of literature that aims to evoke as emotional response. According to Shakespeare, ”Poetry means the art which uses words as both speech and song to reveal.” ‘Poetry is a spontaneous overflow of powerful feelings.’ -
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर
‘त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर’ हे सुंदर पुस्तक वाचकांसमोर आणल्याबद्दल लेखिका वर्षा भरत शिरसाठ यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
खरे तर रमाईच्या त्यागावर आज तुमचे आणि आमचे सुंदर जीवन सजलेले आहे. तुम्ही आणि आम्ही खात असलेली भाकर ही रमाईने तयार केलेली आहे. आमचे वैभव हे रमाईच्या प्रचंड अश्रुंनी मिळालेली किंमत आहे. तुमचे-आमचे ऐश्वर्य हे रमाईच्या चार मातीत गेलेल्या लेकरांमुळे आहे. म्हणून रमाईचा त्याग आपण कधीही विसरायला नको. लेखिका वर्षा भरत शिरसाठ यांनी हे सारे आपल्या छोट्याशा पुस्तिकेमध्ये सुंदर पद्धतीने गुंफलेले आहे. रमाईच्या लेकरांच्या जाण्याचा प्रसंग हा हृदय पिळवटून टाकतो. डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागतात. पुस्तक पुढे जाऊन आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडते. रमाईच्या त्यागमय जीवन प्रवासात पुस्तिका कशी संपते, हे आपल्याला सुद्धा कळत नाही. या सुंदर पुस्तिकेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, हे आवाहन करतो व वर्षा शिरसाठ यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो !– प्रा. शुक्राचार्य गायकवाड
Tyagamurti Mata Ramabai Ambedkar
-
-
-
निबंधशिल्प
उत्कृष्ट विचारमंथनातून स्फुरलेले निबंध विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्द करतांना मनस्वी आनंद होत आहे. हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, शिक्षक यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
कोणतेही लेखन करतांना अगोदर आपल्याजवळ विचार हवे, ते मांडण्याची क्षमता हवी, त्यातूनच लेखन कौशल्य विकसित करता येते.
ज्याप्रमाणे मण्यांची माळ तयार करण्यासाठी विविध मणी सुंदर रितीने आपण त्या माळेमध्ये गुंफतो, त्याप्रमाणे समर्पक शब्दरचना, योग्य दाखले, उदाहरणे आणि काही अवतरणे, सुभाषिते, कवितेच्या ओळी ओवल्या की निबंधाची माळ तयार होते.
विद्यार्थ्यांनी वाचलेलं, ऐकलेलं असतं, पण ते त्यांना साध्या, सहज, सोप्या भाषेत मांडता येत नाही. निबंध म्हणजे एकत्रितरित्या आपले विचार बांधणे होय. आपल्या मनातील विचारांची मुद्देसूद मांडणी, योग्य भाषाशैली, सुसंगतपणा ही उत्कृष्ट निबंधाचे टप्पे आहेत. सतत वाचन केल्याने चांगले लेखन करता येऊ शकते. त्यामुळे आपला शब्दसंग्रह वाढतो.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही निबंध कितीही व्यवस्थित लिहिला असेल परंतु त्यात शुद्धलेखनाच्या चुका असतील तर तुमचे गुण त्यामुळे कमी होऊ शकतात. त्यामुळे आपले लेखन शुद्ध असावयास हवे. -
-
-
स्त्री-पुरूष समानता
‘स्त्री-पुरूष समानता’ या पुस्तकाची आवृत्ती आपल्या हाती देतांना मला मनस्वी समाधान वाटत आहे. कारण हे पुस्तक म्हणजे माझ्या जीवनातील काही प्रसंगांचे अनुभव कथन आहे, तसेच विविध घटनांची शृंखला आहे. स्त्री-पुरूष समानता हा अत्यंत संवेदनशील विषय या पुस्तकात हाताळण्यात आला आहे. भारत हा पूर्वीपासून एक पुरूषप्रधान देश आहे. असे मानले जाते. परंतु पुरूष आणि स्त्री समान आहेत. पुरूषांच्या बरोबरीने स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. स्वत:च्या कुटूंबाला हातभार लावण्यासाठी व आपल्या शिक्षणाचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करण्यासाठी स्त्रियांना नोकरी करण्यासाठी बाहेर पडावे लागते.
Stri – Purush Samanata