• धगधगते तळघर

    कवयित्री उषा हिंगोणेकरांची कविता माणसाच्या सार्वभौम अस्तित्वाच्या निर्मितीसाठी निर्वाण मांडणारी कविता आहे. या कवितेत अनेक धगधगत्या संग्रामांची दृश्ये वाचकाला दिसतील आणि अनेक संग्रामांचे आवाजही वाचकाला ऐकायला येतील. ही कविता, कविता लिहिण्यासाठी वा उषा हिंगोणेकरांना कवयित्री करण्यासाठी लिहिली गेलेली नाही. ही कविता माणसांच्या स्वाभिमानाची, त्यांच्यातील सौहार्दाची आणि सलोख्याची प्रस्थापना करण्यासाठी लिहिली गेलेली आहे. या कवितेतील मूल्यदंड कुठेही वाकत नाही कारण तो माणुसकीच्या सत्याचा आणि सौंदर्याचा अजिंक्य मूल्यदंड आहे. सनातनी व्यवस्थेवर अंगार उधळणारी ही कविता जीवनातील सर्वच असत्यांनाही चौकात उभे करून फटकारे मारते. माणसाला विद्रूप करणार्‍या सर्व बंधनांचे जाहीर दहन ती करते. पुरुषसत्ताकावर, असत्यसत्ताकावर आणि दंभसत्ताकावर ती सरळ हल्ला चढवते. माणुसकीच्या प्रस्थापनेच्या मार्गात आडवे येणार्‍या सर्वच अवरोधांच्या चिंध्या ती करते. वाचकाला अशा मुक्त मनस्वीपणाचे पडघम या कवितेतून ऐकायला येतील आणि माणुसकीच्या प्रज्ञानी सौंदर्याशी जोडतील ही खात्री मला आहे.

    – डॉ. यशवंत मनोहर

    Dhagadhagate Talghar

    350.00
    Add to cart