अशोक पवारांच्या साहित्यातील लेखनविषयक जाणिवा आणि बोलीभाषा
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
साहित्य कृतीतून ज्यावेळी अशोक पवार अभिव्यक्त होतात त्यावेळी मानवाच्या अस्सल जगण्याची प्रतिकृतीच जणू नजरेसमोर ठेवत आहेत असे वाटते. त्यातील एकेक अनुभव वाचकाला देहभान विसरून मेंदूला हादरे देऊ लागतो. इतकी कल्पनाबाह्य आणि मरणालाही न भिता ही माणसं कशी जगत असेल या विचारांनी वाचकाचे मन कासावीस करून सोडते. मनाची ही अस्वस्थताच जिथे वाचकाला विचार करावयास भाग पाडते तेच साहित्य ‘अक्षर साहित्य’ ठरत असते.
अशोक पवारांचे साहित्य हे याच पठडीतले आहे. त्यामुळे क्षणार्धात ते वाचकांच्या मनाचा ठाव घेते. एकेका माणसाचे अनुभव जाणून घेण्यास ते वाचकाला बाध्य करते.
– डॉ. अनंता सूर
Ashok Pawaranchya Sahityatil Lekhanvishyak Janiva Aani Bolibhash
अशोक पवारांच्या साहित्यासंदर्भात 9
- अशोक पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण
- भटक्या विमुक्तांची पूर्वपीठिका
- अशोक पवारांच्या साहित्यातील लेखनविषयक जाणिवा
- अशोक पवार यांच्या साहित्यातील बोलीभाषा
- समारोप
परिशिष्ट 1 : अशोक पवार यांचे साहित्य आणि पुरस्कार
परिशिष्ट 2 : अशोक पवार यांची मुलाखत
परिशिष्ट 3 : संदर्भग्रंथांची सूची