आदिवासींची शैक्षणिक स्थिती
Education Status of Tribals
Authors:
ISBN:
Rs.125.00
- DESCRIPTION
- INDEX
समाजकार्य अभ्यासक्रमात क्षेत्रकार्य हे समाजकार्य शिक्षणाचा आत्मा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. क्षेत्रकार्याचे पर्यवेक्षण करित असतांना आदिवासी भागातील, डोंगरात वास्तव्य असणार्या अनेक गावातील परिस्थितीचा अभ्यास करतांना तेथील मुलांचे शिक्षणाचे तसेच त्या भागात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात आले. त्या भागातील शिक्षणाच्या अशा परिस्थितीस कारणीभूत वरवर काही कारणे लक्षात जरी आली तरी त्या संदर्भातील वास्तविक कारणे काय असावित याची उत्सुकता निर्माण झाल्यामुळे त्या विषयी या आदिवासी शिक्षणाच्या स्थितीबाबतचे अध्ययन करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्थितीवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या शिक्षकाच्या माध्यमातून तसेच प्राथमिक शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी व आदिवासी आश्रमशाळांमधून शिक्षण घेवून विविध पदांवर कार्यरत असणार्या व्यष्टींच्या माध्यमातून तथ्य संकलीत करण्यात आले.
Aadivasinchi Shaikshanik Sthiti
- भारतीय शिक्षणाचा आढावा : अ) भारतीय शिक्षणाचा ऐतिहासिक आढावा, ब) आदिवासी समाजाचा शैक्षणिक आढावा.
- पुर्व संशोधन आढावा
- संशोधन पद्धती व अध्यन क्षेत्र परिचय : अ) संशोधन पध्दती, ब) अध्ययन क्षेत्र परिचय
- आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती दर्शक सारण्या
- निष्कर्ष व सूचना
Author
Related products
महिला सबलीकरण
Rs.550.00खानदेशातील साहित्य व समाजदर्शन
Rs.195.00ग्रामीण समाज : काल, आज आणि उद्या
Rs.495.00समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना
Rs.250.00






