आदिवासी तडवी भील
तडवी भाषा आणि तडवी लिपी
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
जगातील तसेच भारतातील पहिली सभ्यता म्हणुन आदिवासी भिल्लांचा उल्लेख करावा लागेल. तडवी हे भिल्लांचे वंशज आहेत. आदिवासी तडवींची मातृभाषा ही ‘तडवी’ म्हणुन ओळखली जाते. आदिवासी बोलीभाषा या मुक्त, नैसर्गिक स्वभाव गुणसंपन्न असतात. त्यांच्यात एक प्रकारची सहजता दिसते. आदिवासी तडवी भाषा ही नैसर्गिकपणे ध्वनी, उच्चार, गोडवा, सहजता, ताल, लय, माधुरता या गुणांमुळे हजारो वर्षांपासून फक्त मौखिक परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपावेतो हस्तांतरीत व सहजच चालत आलेली आहे. काळाच्या ओघात ती लोप पावली नाही. आदिवासी जमातीच्या रूढी, परंपरा, चालीरिती, चालचलन, जीवन व्यवहार, रीतीरिवाज, खानपान, सांस्कृतिक, सामाजिक, जीवन पद्धती, वाङ्मय, लोककथा, साहित्य संपदा या बाबी मौखिक स्वरूपात एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपावेतो हस्तांतरीत होत आलेल्या आहेत. तडवी लिपीच्या वापराने अख्खी विश्वजात, विश्वसाहित्य, विश्वलोकवाङ्मय व विश्वलोकाभिमुखता सामावून घेण्याची ताकद निश्चितच आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटू नये.
Aadivasi Tadvi Bhil : Tadvi Bhasha Aani Tadvi Lipi
1. वर्णमाला : स्वर, 2. वर्णमाला : व्यंजने, 3. जोडाक्षर, 4. चिन्हे, 5. रेफ मात्रा, 6. मात्रा, 7. अनुस्वार, 8. विसर्ग, 9. चंद्रास्तर, 10. नुक्ता, 11. विरामचिन्हे, 12. व्यंजनांचे प्रकार, 13. जोडाक्षरांचे लेखन, 14. संधीचे प्रकार, 15. शब्दांच्या जाती, 16. तडवी लिपी, 17. सर्वनाम : गुजराती + तडवी, 18. सर्वनाम : हिन्दी + तडवी, 19. सर्वनाम : मराठी + तडवी, 20. सर्वनाम : संस्कृत + तडवी, 21. मतितार्थाचे तडवी लिपी रुपांतरण, 22. तडवी लिपी अंक गिनती, 23. सप्ताह गिनती, 24. दिशानिर्देश, 25. शब्दांची पुनरावृत्ती, 26. संपूर्ण वर्णमाला, 27. तडवी लोकगीत, 28. कानडी भाषा शब्द, 29. गुजराती भाषा शब्द, 30. कोकणी भाषा शब्द, 31. तेलगू भाषा शब्द, 32. तामिळी भाषा शब्द, 33. अरबी भाषा शब्द, 34. फारसी भाषा शब्द, 35. इंग्रजी भाषा शब्द, 36. हिंदी भाषा शब्द, 37. पोर्तुगीज भाषा शब्द, 38. तडवी शब्दसंग्रह + तडवी लिपी, 39. तडवी भाषा + तडवी लिपी (म्हणी), 40. मोहेंजोदडो-हडप्पा लिपी, 41. ब्राम्ही लिपी, 42. गिरनार शिलालेख, 43. मोडी (मराठी) लिपी, 44. प्राचीन हस्तलिखित पुस्तक, 45. प्राचीन शिलालेख असीरगड, 46. शारदा (कश्मीरी) लिपी, 47. गुरुमुखी (पंजाबी) लिपी