आधार - नैराश्यात हरवलेल्यांना
Authors:
ISBN:
₹135.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रस्तुत काव्यसंग्रहात सुरुवातीच्या कविता दु:ख, नैराश्य, अपयश यांवर लिहिल्या असून सरतेशेवटी जीवनात घडलेल्या आध्यात्मिक परिवर्तनामुळे लेखिकेने जे काही अनुभवले ते सर्व कवितांच्या माध्यमातून शब्दबद्ध केले. या ग्रंथाच्या माध्यमातून हृदयातल्या भावना व्यक्त करण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला आहे. काही कारणांमुळे मला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यावेळी सर्वांना जो अनुभव येतो तोच मलाही आला. आलेल्या अपयशाने मला जगाचा परिचय करवून दिला. जीवनामध्ये मला खूप यातनांमधून जावे लागले, पण अशातही अनेक वर्षे मी माझे मन स्थिर ठेवू शकले ते केवळ आध्यात्मिक ज्ञानामुळे आणि अखंड हरिनाम स्मरणामुळे… धैर्य, उत्साह व दृढनिश्चयाने मार्ग आक्रमिला… आणि म्हणूनच आज माझा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला असून नवनव्या कल्पना सतत सुचत असतात. त्यासंबंधीच्या कवितादेखील प्रस्तुत काव्यसंग्रहात वाचकांना आढळून येतील.
Aadhar – Nairashyat Haravalelyanna
- पहिली कविता बालपणीची – ‘चारोळी’
- अपयशाचे दु:ख
- ‘आत्मपरिक्षण’ – स्वत:चे अवलोकन (पाहणे)
- वाट – वेगळ्या वळणावरती
- स्वप्न – जे अपूर्ण राहिले
- यश – एक प्रवास
- भावुकता
- लता – एक प्रयत्न, अशक्याला शक्य करण्याचा
- बंधन – एक मनाची वृत्ती (स्थिति)
- अंधार – प्रकाशाचा अभाव
- फुले – एक हताश जीवन कहाणी
- आत्मउपदेश – आरशातले प्रतिबिंब
- आशा – नव्या आयुष्यासाठी
- खोटी नाती – एक अनुभव
- प्रेरणा – जीवन परिवर्तनासाठी
- राग – एक असूर
- आत्मा – दिव्य गुणांची खाण
- जीवनपुष्प – सुगंध सत्कर्मांचा
- ध्येय – एक ध्यास
- ‘सात सूर’ – जीवन संगीताचे
- ‘नाती’ – अमोघ (अव्यर्थ, अचूक) निसर्गकिमया
- ‘अंतिम क्षण/अंत/मृत्यु’
- – नव्या जीवनाची सुरुवात किंवा एक नवी सुरुवात
- ‘गीत’ – आनंदविभोर करणारे
- ‘माझे मन’ – बंधनातून मुक्तीकडे
- ‘मनाची आवड’ – एक ओढ
- ‘संग्रह’ – एक अनमोल ठेव
- शक्ती – एक स्त्रोत (प्रवाह)