आधुनिक बँकिंग प्रणाली
Modern Banking System
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
जगाला बँकिंग व्यवसाय देण्याचे श्रेय इंग्लंडला आहे. इंग्लंडमध्ये तिसर्या एडवर्ड राजाने 1304 मध्ये सरकारी बँकर किंवा सराफ नेमले. सुरुवातीला हे बँकर वेगवेगळ्या देशातील नाण्यांचे व्यवहार करीत असत. तसेच स्वत:जवळील पैसे सुध्दा कर्जाऊ देत असत. या व्यवहारातून मिळणार्या नफ्याचा काही भाग राजाला द्यावा लागत असे. कालांतराने सोनारांनी लंडनमध्ये हा व्यवसाय सुरु केला. सोनाराजवळ जमा झालेले पैसे बराच काळ पडुन राहत होते, म्हणून त्यांनी कर्ज देण्यास सुरुवात केली. ठेवींमध्ये वाढ व्हावी यासाठी ठेवींवर व्याज देणे सुरु केले. हे सर्व व्यवहार पावत्यांवर होवू लागले. सोनारांनी दिलेल्या पावत्या जी व्यक्ती घेऊन येत असे त्यास रक्कम मिळत असे, त्यामुळे त्या पावत्यांना नोटांचे स्वरुप प्राप्त झाले, अशा प्रकारे आधुनिक बँकिंग व्यवहाराचा पाया त्यावेळी घालण्यात आला. पुढे इ.स. 1694 मध्ये इंग्लंडमध्ये विल्यम पॅटर्सनच्या पुढाकाराने बँकाबाबत टनेजचा कायदा पास झाला. या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये ‘दि गव्हर्नस अॅन्ड दि कंपनी ऑफ बँक ऑफ इंग्लंड’ ही बँक स्थापन झाली.
सदरील पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून व्यापारी अधिकोष, केंद्रिय अधिकोष, सहकारी बँका आणि नाबार्ड, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी आणि जागतिक अधिकोष, बँकिंग क्षेत्रातील आधुनिक सेवांच्या बाबतीत विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना बँकिंग संदर्भातील अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Aadhunik Banking Pranali
- व्यापारी अधिकोष : 1.1 बँक-अर्थ आणि प्रकार, 1.2 व्यापारी अधिकोषाची कार्ये, 1.3 प्रत्यय निर्मिती
- केंद्रीय अधिकोष : 2.1 केंद्रीय बँक किंवा अधिकोष, 2.2 प्रत्यय नियंत्रण, 2.3 रिझर्व बँकेचे मौद्रिक धोरण
- सहकारी बँका आणि नाबार्ड : 3.1 सहकारी संस्था, 3.2 सहकारी बँक-अर्थ आणि प्रकार, 3.3 सहकारी बँका, 3.4 राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)
- आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी आणि जागतिक अधिकोष : 4.1 आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी, 4.2 जागतिक अधिकोष, 4.3 जागतिक व्यापारी संघटना आणि बँकिंग क्षेत्र
- बँकिंग क्षेत्रातील आधुनिक सेवा : 5.1 स्वयंचलित गणकयंत्र, 5.2 डेबिट कार्ड, 5.3 क्रेडिट कार्ड, 5.4 ई-मार्केटींग, 5.5 रोकडविरहीत व्यवहार, 5.6 मोबाईल बँकिंग, 5.7 ई-वॉलेट, 5.8 कोअर बँकिंग, 5.9 रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट, 5.10 नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर