आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास’ या पुस्तक शासनाची एखादी योजना अभ्यासणे, योजनेचा लाभार्थ्यांवर झालेला सर्वांगीण परिणामांचा अभ्यास करणे ही खरोखरच भूषणावह बाब असून इतर संशोधकही शासकीय योजनांचे सर्वंकष मुल्यमापन करतील ही अपेक्षा. इंदिरा आवास योजनेचे सर्वाधिक लाभार्थी हे ग्रामीण भागात राहणारे दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणारे अनुसूचीत जाती/जमाती समुदायातील लोक आहेत. या योजनेमुळे या समुदायातील लाभार्थ्यांवर काय परिणाम झाला? ह्या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी असणारे अनुसूचीत जाती/जमाती समुदायातील लाभार्थ्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक जीवनात घरकुल योजनेमुळे कश्या पध्दतीने परिवर्तन घडून आले याबाबतची माहिती पुस्तकात दिलेली आहे.
इंदिरा आवास योजनेबाबतची लाभार्थ्यांची मते, योजना अधिक पारदर्शक बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी सांगितलेल्या सुचना, आवास योजनेचा लाभ मिळवतांना आलेल्या अडचणी आणि आवास योजना अधिक पारदर्शक आणि सक्षम बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी मांडलेली मते तसेच अनुसुचित जाती/जमातीची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक समस्या, वैशिष्ट्ये याबाबतीत केलेला सविस्तर विश्लेषणात्मक अभ्यास, आवास योजनेचे महत्त्व, आवश्यकता यांचादेखील यथायोग्य समावेश केला आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणामी आर्थिक विकास झालेला दिसून येत आहे. तरीदेखील आवास योजनेचा प्रचार, प्रसार आणि योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी, आवश्यकता असल्याचे दिसून येते. विविध संशोधक, विविध अहवाल, संदर्भग्रंथ यांची आवास योजनेबद्दलची मते संदर्भ साहित्य म्हणून देण्यात आलेली आहेत.
Awas Yojana Aani Anusuchit Jati v Jamatincha Vikas
- इंदिरा आवास योजनेचा इतिहास
- इंदिरा आवास योजनेची कार्य पद्धती
- इंदिरा आवास योजनेची जिल्ह्यातील स्थिती
- तज्ज्ञ व संशोधकांची मते
- अध्ययन पद्धती
- दारिद्य्र व त्याची कारणे
- अनुसूचित जाती : समस्या व उपाययोजना
- अनुसूचीत जमाती : समस्या व उपाययोजना
- निष्कर्ष
- इंदिरा आवास योजना – सारांश