काटेरी पायवाट आकलन आणि आस्वाद
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
अनंता सूर यांचे ‘काटेरी पायवाट’ हे एक महत्त्वाचे संघर्षशील आत्मकथन विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारीची समस्या याविषयी धीटपणे आणि दाहक विचार मांडणारे जळजळीत लेखन आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्ट्राचार, बाजारू वृत्ती, आणि मस्तवालपणा यांसारख्या कुप्रवृत्तीवर अनंतानी आपल्या अनुभवांच्या आधारे नेमकेपणाने बोट ठेवले आहे. सामान्य माणसांचा संघर्ष आणि चिवटपणे जगण्याची जिद्द याचे वर्णन या आत्मकथेत परखड आणि प्रांजळपणे व्यक्त झाले आहे.
बेकारी आणि गरिबीशी झुंज देत लेखकाने जगण्याचा संघर्ष केलेला आहे. दहावीत गणितात दोनदा नापास होऊनही प्राध्यापक होण्यापर्यंतच्या पात्रतेचे उच्च शिक्षण तो घेतो. नौकरीअभावी नागपुरात सायकलने पाच नामांकित महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करतो. प्रचंड उमेद आणि ऊर्जा घेऊन तो बेरोजगारीशी झगडत राहतो. म्हणूनच अनंताचे या आत्मकथनातील दुःख आणि दैन्य वाचतांना वाचक अंतर्मुख आणि आशावादी होतो हे या आत्मकथेचं यश आहे.
– शरणकुमार लिंबाळे
Kateri Paywat Akalan ani Aswad
- ‘काटेरी पायवाट’ विषयी पत्र – इंद्रजीत भालेराव
- सुसंस्कृत तरुणाची गळचेपी उलगडणारे आत्मनिवेदन: काटेरी पायवाट -डॉ. सुहासकुमार बोबडे
- ‘काटेरी पायवाट’ मधील संघर्ष – प्रा. गिरीश मोरे
- शैक्षणिक जीवनाची यशोगाथा: काटेरी पायवाट – राजेंद्र भोसले
- काटेरी पायवाट : एक प्रांजळ अनुभवकथन – डॉ. सुधा भरत मालधुरे
- काटेरी पायवाट : प्रगल्भ जाणिवांचे लक्षवेधी आत्मकथन – डॉ. बळवंत भोयर
- नितांत प्रांजळ व निर्भीड आत्मकथन: काटेरी पायवाट – डॉ. फुला बागूल
- कष्ट आणि जिद्दीचा समन्वय साधणारे प्रेरणादायी आत्मकथन : काटेरी पायवाट – डॉ. श्रुती वडगबाळकर
- संघर्षमय जीवनाची प्रकाशमय वाट : काटेरी पायवाट – डॉ. संतोष देठे
- बेरोजगारीच्या व्यथेला उज्ज्वल भविष्य देणारे आत्मकथन: काटेरी पायवाट – डॉ. बाबुराव उपाध्ये
- जिद्द आणि संघर्षाची यशोगाथा : काटेरी पायवाट – डॉ. चंद्रकांत पोतदार
- काटेरी पायवाट: ग्रामीण तरुणाईला भान देणारे आत्मकथन – डॉ. कैलास दौंड
- काटेरी पायवाट : वास्तवाचं विस्तव मांडणारे आत्मकथन – डॉ. विशाखा कांबळे
- धडपडणाऱ्या युवकाची प्रेरणादायी संघर्षकथा: काटेरी पायवाट – सुरेश साबळे
- प्रतिकूल परिस्थितीशी निकराने झगडणारे आत्मकथन: काटेरी पायवाट – अशोक लोटणकर
- शेतकऱ्याच्या पोराची संघर्षमय गाथा: काटेरी पायवाट – वीरभद्र मिरेवाड
- अनंता सूर यांच्या प्रवासातील काटेरी पायवाट – श्री. पंडित कांबळे
- व्यवस्थेतील त्रुटींची शहानिशा करणारे आत्मचरित्र: काटेरी पायवाट – अनंत कराड
- जीवनातील काटेरी प्रवासाचा संघर्ष उलगडणारे आत्मकथन : काटेरी पायवाट – सौ. वंदना कुलकर्णी
- एका संघर्षशाली युवकाची झुंज : काटेरी पायवाट – अंबादास केदार
- रक्तबंबाळ वेदनांच्या जिद्दीची कहाणी : काटेरी पायवाट – प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर
- ध्येयप्राप्तीसाठी तुडवलेली ‘काटेरी पायवाट’ – प्रा. भास्कर बंगाळे
- सुसंस्कारित करणारी काटेरी पायवाट – डॉ. सतेज दणाणे
- काटेरी पायवाट : एक प्रेरणादायी दस्तऐवज – डॉ. राजेंद्र खंदारे
- काटेरी पायवाट : मुक्त श्वासांचे रक्ताळलेले जगणे – डॉ. प्रभाकर शेळके
- अपयशातूनही यशाचे शिखर गाठणाऱ्या अनंताचे आत्मकथन : काटेरी पायवाट – प्रा. शिवाजीराव देवनाळे
- विदर्भाच्या लहेजायुक्त बोलीभाषेतील संघर्षमय आत्मकथन : काटेरी पायवाट – डॉ. रूपेश कऱ्हाडे
- असंख्य अडचणींचे पापुद्रे लिंपणारा उर्ध्वप्रवास:काटेरी पायवाट – प्रा. राहुल दहिवले
- काटेरी पायवाट : शेतकऱ्याच्या मुलाचा जिद्दीचा प्रवास – प्रा. विलास सुर्वे
- शिक्षणासाठी धडपडणाऱ्या युवकाचे प्रेरक आत्मकथन: काटेरी पायवाट – सौ.भाग्यरेखा नागमोते
- काटेरी पायवाट:अंधारवाटेवर प्रकाश पेरणारे वैचारिक मंथन – अनिल मनोहर
- बेरोजगारीचं संघर्षमय आलेख रेखाटणारे आत्मकथन: काटेरी पायवाट – निंबाजी हिवरकर
- स्वतःलाच खोदत नेणारे आत्मकथन : काटेरी पायवाट – डॉ. अनिलकुमार दडमल
परिशिष्टे :
- काटेरी पायवाट या आत्मकथनाला मिळालेले पुरस्कार
- अनंता सूर यांचे समग्र साहित्य
- अनंता सूर यांना मिळालेले वाङ्मयीन पुरस्कार
- डॉ.अनंता सूर यांची ‘काटेरी पायवाट’च्या निमित्ताने घेतलेली मुलाखत