कापूस प्रक्रिया उद्योग
Cotton Processing Industry
Authors:
ISBN:
₹180.00
- DESCRIPTION
- INDEX
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कापूस पिकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच जिल्ह्यात कापसाचे उत्पादन होते. सर्वच जिल्ह्यात कापूस प्रक्रिया उद्योग आहेत. या उद्योगाचा कल सामान्यतः विकेंद्रीकरणाकडे आहे. महाराष्ट्रातील या उद्योगधंद्यामुळे विशेषतः ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण होत आहे. हा उद्योग श्रमप्रधान आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्यास मदत होत आहे. तसेच शहरात होणार्या लोकांच्या स्थलांतराला या उद्योगामुळे काहीअंशी आळा बसतो. या उद्योगात एकाच वेळी अनेक क्षेत्राचा विकास होतो. यात स्थानिक साधनसामग्री मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. वेळ, श्रम, पैसा वाचतो म्हणून या उद्योगाला अतिशय महत्त्व आहे.
या कारखान्यांचा पूर्वइतिहास पाहता, ब्रिटिशकाळापासून हे कारखाने महाराष्ट्रात स्थापन झाले आहेत. अनेकदा हे कारखाने सुरू झालेत आणि बंद पडले आहेत. भविष्यात महाराष्ट्रातील कापूस प्रक्रिया उद्योगाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरणार आहे. या पुस्तकाचा वाचकाबरोबर सरकार, संशोधक, उद्योजक, कापूस उत्पादक शेतकरी, तसेच या उद्योगावर आधारित पूरक उद्योगधंद्यातील उद्योजक यांना उपयोग होणार आहे. भारताच्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत शेतीवर आधारित असलेल्या उद्योगांच्या प्रगतीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
अतिशय सोपी भाषा, स्थानिक भाषा व संकल्पनांचा वापर, आलेख, तक्ते, नकाशे, फोटो यांचा वापर केल्यामुळे हे पुस्तक समजण्यास सोपे झालेले आहे. लेखकाने क्षेत्र भेटी देऊन गोळा केलेली माहिती व आकडेवारीच्या साहाय्याने केलेले विश्लेषण वास्तव परिस्थितीचे दर्शन घडविते. अत्यंत मेहनत घेवून तयार केलेले हे पुस्तक कापूस उद्योगास तसेच अर्थशास्त्राच्या अभ्यासकास उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.
Kapus Prakriya Udyog
- भारतातील कापूस उत्पादक प्रदेश : प्रस्तावना, भारतातील कापूस उत्पादक विभाग, भारतातील कापूस उत्पादन घेणारे प्रमुख राज्यनिहाय प्रदेश, महाराष्ट्रातील कापूस उत्पादक व कापूस प्रक्रिया होणारे जिल्हे, महाराष्ट्रातील कापूस उत्पादक जिल्हे.
- कापूस प्रक्रिया उद्योग : जिनिंग/ वटण/ रेचाई, जिनिंगचे महत्त्व, जिनिंगची ऐतिहासिक पार्श्वभूमी, प्रेसिंग / दाबणी, प्रेसिंगचे महत्त्व, प्रेसिंग प्रक्रिया, भारतातील कापूस जिनिंग प्रेसिंग उद्योग, भारतातील जिनिंग प्रेसिंग उद्योगाचे एकत्रीकरण (क्लॅस्टर्स)
- कापूस प्रक्रिया कारखान्यांची सर्वसाधारण माहिती : जनिंग व प्रेसिंग कारखान्याचा आराखडा, 1) वेईग ब्रिज (भूईकाटा) 2) रस्ते 3) पाण्याची टाकी / हौद 4) कार्यालये 5) कामगार निवास व्यवस्था 6) इतर सुविधा, कापूस जिनिंग व प्रेसिंग कारखान्यातील विविध यंत्रे आणि उपकरणे, कापूस जिनिंग
- कापूस प्रक्रिया उद्योगावर आधारित उद्योग व व्यवसाय : कापूस प्रक्रिया उद्योग उपउत्पादने, सरकी तेलनिर्मिती उद्योग, सरकी उत्पादन ऐतिहासीक पार्श्वभूमी, सरकी हाताळणी व साठवणूक, सरकीपासून तेल गाळप करण्याची पध्दती, सरकी तेलाचे वैशिष्ट्ये, सरकीपासून पशुखाद्य/ पेंड/ ढेप निर्मिती
- जळगाव जिल्ह्यातील कापूस प्रक्रिया उद्योगाचा इतिहास व सद्यस्थिती : जळगाव जिल्ह्यातील जिनिंग व प्रेसिंग उद्योगाचा इतिहास, जळगाव जिल्ह्यातील कापूस जिनिंग व प्रेसिंग उद्योगाचा मागोवा, जळगाव जिल्ह्यातील जिनिंग व प्रेसिंग उद्योगाची सद्य:स्थिती, जळगाव जिल्ह्यातील कापूस जिनिंग
- कापूस जिनिंग व प्रेसिंग प्रक्रिया उद्योगातील समस्या : महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकर्यांच्या समस्या, कापूस उत्पादक शेतकर्यांच्या उत्पादन विषयक समस्या, कापूस उत्पादक शेतकर्यांच्या कापूस विक्री विषयक समस्या, कापूस साठवणुकीतील समस्या, कापूस जिनिंग व प्रेसिंग उद्योजकांच्या समस्या