Prashant Publications

कौटिल्याचे अर्थशास्त्र

Authors: 

Tag: ISBN: 9788199023611

ISBN:

SKU: 9788199023611
Category: Tag: ISBN: 9788199023611
Category:

Rs.175.00

  • DESCRIPTION
  • INDEX

‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ या पुस्तकात कौटिल्य अर्थशास्त्राची संकल्पना, कौटिल्य यांची अर्थतज्ज्ञ म्हणून भूमिका, तसेच या ग्रंथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विषद करण्यात आली आहे. आदर्श किंवा कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडताना कौटिल्यांची दूरदृष्टी स्पष्ट होते. त्याचबरोबर कौटिल्यकालीन समाजव्यवस्था, सामाजिक जीवन, अर्थव्यवस्था व सात मूलभूत सिद्धांत यांचे विवरण पुस्तकात आहे. या ग्रंथात कौटिल्यांच्या काळातील व्यवसायांचे स्वरूप आणि सार्वजनिक वित्तव्यवस्थेबद्दल त्यांचे विचार, तसेच चलनव्यवस्थेवरील दृष्टिकोन यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्यवसायविषयक विचारांमध्ये शेती, पशुपालन, व्यापार (विशेषतः परकीय व्यापार), व्यापार मार्ग, खाणी, कारखाने आणि विविध उद्योगधंदे यांचा समावेश आहे. कौटिल्यांचे विचार आणि नीती आजच्या युगातही शासकीय धोरण, व्यवस्थापन व आंतरराष्ट्रीय संबंध यांमध्ये मार्गदर्शक ठरतात. कौटिल्यांचा दृष्टिकोन व्यवहारिक, कठोर आणि परिणामाभिमुख होता, जो आजही तितकाच परिणामकारक वाटतो. ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ हे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि प्रशासन या तिन्ही विषयांचा संगम असल्याने हे पुस्तक विद्यार्थी, अभ्यासक व अध्यापक यांच्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल.

१. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा परिचय (Introduction to Kautilya’s Economics)

१.१ अर्थतज्ज्ञ म्हणून कौटिल्याची भूमिका

१.२ कौटिल्याच्या अर्थशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी

१.३ आदर्श अथवा कल्याणकारी राज्यासाठी कौटिल्याची दिव्यदृष्टी

१.४ कौटिल्याच्या काळातली समाज आणि सामाजिक जीवन

१.५ राज्यव्यवस्थेचा सप्तांग सिद्धांत आणि कोषाचे (कोषागार) महत्त्व

१.६ कौटिल्य कालीन अर्थव्यवस्था

२. कौटिल्याचे अर्थशास्त्र : व्यापार आणि धोरण (Kautilya’s Economics: Trade and Polices)

२.१ कौटिल्याच्या काळातील व्यवसाय.

२.२. सार्वजनिक वित्तव्यवस्थेबद्दल कौटिल्याचे विचार सार्वजनिक महसूल, सार्वजनिक खर्च, अर्थसंकल्प आणि कर्ज.

२.३. चलनव्यवस्थेबद्दल कौटिल्याचा दृष्टीकोन.

२.४. आर्थिक व्यवस्थेत व्यापार आणि वाणिज्य याबाबत कौटिल्याचा दृष्टीकोन.

२.५. कौटिल्याच्या अर्थशास्त्राची समकालीन प्रासंगिकता.

Author

RELATED PRODUCTS
कौटिल्याचे अर्थशास्त्र
You're viewing: कौटिल्याचे अर्थशास्त्र Rs.175.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close