जनसंज्ञापन आणि पत्रकारिता (पेपर 2 व 3)
Mass Communication & Journalism (Paper 2 & 3)
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
विद्यापीठात किंवा वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करण्यासाठी युजीसीमार्फत सेट-नेट या पात्रता परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि सरावाने यात यश प्राप्त करता येते. जनसंवाद आणि पत्रकारिता (Mass Communication & Journalism) या विषयात सेट-नेट परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या आता वाढते आहे. या विषयाचा अभ्यासक्रम विस्तीर्ण आहे. त्या तुलनेत सेट-नेट या परीक्षांच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांची उपलब्धता अल्प आहे. त्याचसोबत पीएच्.डी पदवीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्या पेट परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता देखील मार्गदर्शक पुस्तकाची मागणी वाढत आहे. सेट-नेट व पेट या तीनही परीक्षा डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आलेले हे पुस्तक त्यामुळेच या विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे आहे. या पुस्तकात मागील काही वर्षीच्या सेट-नेट परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचादेखील विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे. पुस्तक लेखन करणारे डॉ.सुधीर भटकर व प्रा. विनोद निताळे या लेखक द्वयींचे मन:पूर्वक अभिनंदन. जनसंवाद आणि पत्रकारिता (Mass Communication & Journalism) या विषयात सेट-नेट,पेट या परीक्षा देणार्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!
– प्रा.पी.पी.पाटील,
कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Jansandynapan Ani Patrakarita (Paper 2 & 3)