जिभाऊ : प्रा. डॉ. विजय पवार यांची चरित्रगाथा
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये ते ‘जिभाऊ’ या नावाने परिचित होते.
साडेतीन दशकांचा काळ सरांच्या सहवासात राहिले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मी प्रत्यक्षपणे अनुभवले, त्यांचा विनम्र पण करारी स्वभाव. स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रियता, दुसर्यांना सतत मदत करण्याची धडपड आणि आपल्याबरोबर इतरांनाही पुढे नेण्याची त्यांची वृत्ती, मलाही फार आवडायची. म्हणून मी सतत त्यांच्या सोबत असायची.
जेव्हा त्यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला तेव्हा त्यांच्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मला परिचय झाला. गरीब म्हणून लाचारी न पत्करता प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचं धाडस व कसबही त्यांच्याकडे होते. संपूर्ण आयुष्य ते स्वाभिमानाने जगले. त्यांच्या नावातच ‘विजय’ असल्यामुळे हार पत्करणे त्यांना कधी रुचलेच नाही.
Jibharu : Prof. Dr. Vijay Pawar Yanchi Charitragatha