‘दासबोधा'तील मानवी मूल्ये
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
मानवी जीवनाच्या साफल्यासाठीच ‘दासबोधा’ची रचना समर्थांनी केली. ‘दासबोधा’तील समर्थांनी सांगितलेली चतु:सूत्री म्हणजे सुखी, संपन्न, समर्थ व सफल जीवनाची गुरुकिल्लीच होय. समर्थकृत ‘दासबोध’ हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दासबोधा’सारखा सार्वकालिक श्रेष्ठ ग्रंथ लिहून संत रामदासांनी स्वत:ची नाममुद्रा मराठी संतसाहित्यात उमटवली. सध्याच्या धावपळीच्या काळात मानवी नातेसंबंधात आलेला दुरावा, अत्याधिक भोगवादाकडे झुकलेले समाजमन, त्यागसमर्पणादि मूल्यांचा ऱ्हास, माणसांची पशुत्वाकडे होणारी वाटचाल या घटना पाहून सर्वंच बाबतीत भ्रमनिरास होत चालला आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘दासबोध’ हा ग्रंथ एक पायवाट दाखवतो. या पायवाटेवरून चालल्यावर माणसे खऱ्या अर्थाने समाधानी होणार आहेत. यातली मानवी मूल्ये मानवाला सातत्याने तो मानव असल्याची जाणीव करून देणार आहेत.
Dasbodhatil Manvi Mulye
- समर्थ रामदासांचे चरित्र व विचार
- समर्थांच्या ‘दासबोधा’तील मानवी मूल्ये
- ‘दासबोधा’तील मानवी मूल्यांची मीमांसा
- ‘दासबोधा’तील मानवी मूल्यांची प्रासंगिकता