दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास (1206 ते 1526)
History of the Delhi Sultanate (1206 to 1526)
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
भारताचा सर्वप्रथम अरब आक्रमणांनी आक्रमणे केली. मुहम्मद बिन कासिम यांनी भारतावर पहिले आक्रमण केले. यानंतर तुर्कानी भारतावर आक्रमणे केली आणि भारतात आपली सत्ता स्थापन केली. कुतुबुद्दीन ऐबक हे महंमद घोरी यांच्या भारतातील राज्याचे प्रतिनिधी होते. महमंद घोरी यांच्या मृत्युनंतर इ.स. 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी स्वतःला राज्याभिषेक करुन सुलतान ही पदवी धारण केली. त्यांच्या राज्याची राजधानी दिल्ली होती. ऐबक यांनी स्थापन केलेले हे राज्य भारतातील पहिले मुस्लिम राज्य होते. हे राज्य इ.स. 1526 पर्यंत अस्तित्वात होते. इ.स. 1206 ते इ.स. 1526 हा काल खंड दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. याचकाळात गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी राजवंशाने राज्य केले. याचकाळात दक्षिण भारतात विजयनगर व बहमनी राज्य होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व प्रशासन, कला आणि वास्तुकलेचा इतिहास दिला आहे.
Delhi Sultanshahicha Ithihas (1206 te 1526)
- इतिहासाची साधने : मध्यकाल किंवा दिल्लीसलु तानशाहीच्या इतिहासाची साधने.
- अरबांची भारतावर आक्रमणे : राजकीय स्थिती, राज्यव्यवस्था, आर्थिक स्थिती, व्यापार, वाणिज्य व उद्योगधंदे, सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती, अरब आक्रमणापूर्वीचा सिंध, मुहम्मद बिन कासिमचे आक्रमण, मुहम्मद बिन कासिम यांच्या विजयाची व दाहीर यांच्या पराभवाची कारणे, सिंधमध्ये अरब प्रशासन व्यवस्था, सिंधमध्ये अरब शासन अपयशी का ठरले? भारतावर अरब आक्रमणाचा प्रभाव.
- तुर्कांची भारतावर आक्रमणे : महंमद गझनीचा उदय, स्वार्या, दक्षिण भारतातील स्थिती, महंमद घोरींची भारतावरील आक्रमणे, हिंदूंच्या पराभवाची कारणे- सामाजिक, धार्मिक, आर्थिक, लष्करी.
- दिल्लीसुलतानशाहीचा राजकीय इतिहास : स्थापना व दृढीकरण – कुतुबुद्दीन ऐबक, सुलतान शमसुद्दीन अल्तमश, रझिया सुलतान, धियासुद्दीन बल्बन, खिलजी वंश, जलालुद्दीन खिलजी, सुलतान अल्लाउद्दीन खिजली. तुघलक घराणे- गियासुद्दीन तुघलक, महंमद तुघलक. सुलतान फिरोजशहा तुघलक. सय्यद लोदी घराणे- बहलोल लोदी, सिंकदर लोदी, इब्राहीम लोदी.
- बहमनी राज्य : अल्लाउद्दीन हसन बहमनी, मुहम्मदशाह पहिला-दुसरा, फिरोजशाह, अहमदशहा, अल्लाउद्दीन दुसरा, मुहम्मदशहा तिसरा, बहमनी साम्राज्याचा शेवट. दक्षिणेतील पाच मुस्लिम राज्ये, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती.
- विजयनगर साम्राज्य : विजयनगर साम्राज्याची स्थापना, तालीकोट उर्फ राक्षस तागडीची लढाई, विजयनगरची शासन व्यवस्था, विजयनगरच्या पतनाची कारणे, विजयनगर काळातील समाजिक
- सामाजिक व धार्मिक स्थिती : सामाजिक स्थिती – मुस्लिम समाजावर हिंदू प्रभाव, भारतीय मुसलमान, हिंदू समाजाची स्थिती, जातीप्रथा, गुलामगिरीची प्रथा, स्त्रियांची परिस्थिती, कुटुंब पद्धती, दान प्रथा, शिक्षण. धार्मिक स्थिती – इस्लाम व हिंदू संस्कृतीचा समन्वय, भक्ती आंदोलन- उत्पत्ती, उद्देश, कारणे, संत कबीरांचे तत्त्वज्ञान, भक्ती आंदोलनाची वैशिष्ट्ये. सूफी संप्रदाय – सिद्धांत, प्रमुख सूफी संत
- कला, वास्तुकला व साहित्य : वास्तूकला, प्रांतीय पातळीवरील वास्तुकला, चित्रकला, संगीत कला, साहित्य, गुलाम वंश, तुघलक वंश, खिलजी वंश, संस्कृत साहित्य, फारसी साहित्य, हिंदी साहित्य, उर्दू साहित्य, अरबी साहित्य.
- प्रशासन : केंद्रीय प्रशासन, प्रांतीय प्रशासन, परगणा प्रशासन, ग्राम प्रशासन, कर व्यवस्था, लष्करी व्यवस्था, गुप्तहेर व्यवस्था, न्याय व्यवस्था, इक्ता पद्धत.
Related products
-
मराठा सत्तेचा उदय (इ.स. 1630 ते 1707)
₹9,789,384,228,675.00 -
मूलभूत अर्थशास्त्र
₹375.00