निर्झरास... निवडक बालकवी
Authors:
ISBN:
₹50.00
- DESCRIPTION
- INDEX
केवळ अठ्ठावीस वर्षांचं अल्पायुष्य लाभलेले बालकवी अर्वाचीन मराठी काव्यपरंपरेत अनन्यसाधारण कवी ठरलेत. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. केवळ दहा-अकरा वर्षे कविता लेखन करणार्या या प्रतिभासंपन्न कवीने आयुष्यात केवळ एकशे त्रेसष्ठ कविता लिहिल्या. त्यात पस्तीस ते चाळीस निसर्गकविता व उर्वरित कविता (पूर्ण-अपूर्ण अवस्थेतल्या) काव्यविषयक, प्रेमविषयक, गुढगुंजनात्मक, सामाजिक तथा राष्ट्रभक्तीपर स्वरूपाच्या आहेत.
बालकवी हे बालपणापासून निसर्गातच रमले. शिवाय जीवनातल्या एकटेपणाला कटांळून निसर्गाकडे त्यांचे पलायन झाल्यामुळे त्यांची काव्यवैशिष्ट्ये ही निसर्ग कवितेत अधिक खुलुन दिसली. खानदेशातल्या मातीत रुजलेल्या या औदुंरबरावर अल्पवयातच काळाचा घाला आला. परंतु या औदुंबराच्या मूळा आजही कुठल्यातरी अनामिक ओलाव्यानं तगून आहेत. आज जवळपास एक शतक उलटलं तरीही मराठीतल्या साहित्यिक, रसिक, समीक्षकांना बालकवीची कविता नवनव्या अर्थगर्भ छटांनी, नवनव्या रूपात सापडत आहे. ‘बालकवी’ हे मराठी कवितेला पडलेलं एक मधुर स्वप्न आहे, अशा शब्दात समीक्षकांकडून त्यांचा गौरव झाला आहे. बालकवींची कविता अभिजात कविता ठरते. त्यांचा संप्रदाय निर्माण झाला नाही. परंतु एकूणच अर्वाचीन मराठी कवितेपासून ते आजतागायत लिहिणार्या सार्याच पिढीला बालकवींच्या कवितेने वेड लावले आहे.
निर्झरास.. हे बालकवींच्या निवडक कवितांचे संकलन अभ्यासकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.
Nirzaras Nivdak Balkavi